चित्रा वाघ यांची 'ऑडिओ क्लिप'.. विद्या चव्हाणही भिडल्या, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

चित्रा वाघ यांची 'ऑडिओ क्लिप'
चित्रा वाघ यांची 'ऑडिओ क्लिप'
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आज (30 जुलै) एक पत्रकार परिषद घेत थेट भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा एका ऑडिओ ऐकवला. काल (29 जुलै) विद्या चव्हाण यांनी पेनड्राईव्ह बॅाम्ब टाकणार आणि तुमचे कारनामे उघड करणार असा उघडउघड इशारा दिलेला. त्यानंतर आज विद्या चव्हाणांनी जो ऑडिओ ऐकवला त्यावरून आता नव्या आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. (ncp sp leader vidya chavan plays bjp leader chitra wagh audio clip and criticized harshly)

आपल्याला बदनाम करण्यासाठी कौटुंबिक वादाचं राजकारणात पर्यावसन करण्यात आलं आणि चित्रा वाघ यांना ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं स्वत: चित्रा बोलत आहेत. असा आरोप करत विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघांना टार्गेट केलं. 

विद्या चव्हाणांनी ही ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर अवघ्या काही क्षणात चित्रा वाघ यांनीही पत्रकार परिषद घेऊन चव्हाणांवर पलटवार केला.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चित्रा वाघ यांच्या 'त्या' ऑडिओमध्ये काय?

विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांचा जो ऑडिओ ऐकवला त्यामध्ये चित्रा वाघ या विद्या चव्हाण यांच्या सुनेला त्यांच्यावर नेमका कसा अन्याय होतोय आणि तो मीडियासमोर कसा मांडायचं याविषयी मार्गदर्शन करत असल्याचं ऐकायला मिळत आहे.  

याबाबत विद्या चव्हाण म्हणाल्या की, 'चित्रा वाघ यांनी माझ्या सुनेला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिचा छळ कसा केला होता हे बोलायला सांगितलं. 

ADVERTISEMENT

'विशेष म्हणजे चित्रा वाघ यांना ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं स्वत: चित्रा बोलत आहेत. चित्रा वाघ सूनेचं बोलणं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करुन देतात, त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आपण या प्रकरणाची जबाबदारी चित्रा वाघ यांना दिली आहे. चित्रा वाघ या तुम्हाला मदत करतील”, असं विद्या चव्हाण यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

'एखाद्याच्या घरात काही होत नसेल तर त्याला वेगळं वळण द्यायचं. हे लोकं कशाप्रकारे त्रास देऊ शकतात याचे हे उदाहरण आहे. माझ्या घरातील लोकं राजकारणात नसताना, अशाप्रकारे त्यांना खोटं बोलायला लावणं, सुनेला वकिलांचं पॅनेल देणं, तिला अडीच-तीन लाखांची नोकरी देणं, पार्ल्यात घर मिळवून देणं आणि मला छळायचं'', असं म्हणत विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ आणि भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं

सोमवारी एक व्हिडिओ शेअर करत विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना थेट इशारा दिलेला. 'बजेटमध्ये राज्याला भरभरून दिले अशा थापा तुम्ही मारल्या. आम्ही फेक नरेटीव्ह करतो असा आरोप करता. शरद पवार पित्रुतुल्य आहेत असे सांगता, आता त्याच पवारांना शरद अली म्हणता. राज्याला ज्या पत्रकारांनी, समाजसेवकांनी दिशा दिली, त्यांचा उल्लेख पोपट असा करता. तुमच्यासारख्या खोटारड्या, बनेल, ब्लॅकमेलिंग करणारी, पक्षात मोठे पद मिळवण्यासाठी काहीही करू शकते, हे आम्ही जवळून पाहिले आहे, असं विद्या चव्हाण आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या होत्या. 

चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर 

दरम्यान, यानंतर चित्रा वाघ यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि विद्या चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं, 'मी राष्ट्रवादीत काम करताना मला कधीही लाभाचे पद मिळेल, अशी अपेक्षा केली नाही. पण माझ्याबरोबर पक्षाने काय काय केले, याची मूठ झाकलेली आहे. ती उघडायला लावू नका ताई..., नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल.' असा इशाराच चित्रा वाघ यांनी यावेळी दिला.

चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी एक कार्टून सोशल मीडियावर शेअर केलेलं  या पोस्टनंतर शरद पवारांच्या पक्षाने चित्रा वाघ यांच्यावर बरीच टीका केली होती. ज्यानंतर एकूणच सगळ्या वादाला सुरुवात झाली.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT