Vidhan Sabha Opinion Poll : विधानसभेतही महायुतीला बसणार झटका, 'मविआ'चं काय? खळबळ उडवणारा सर्व्हे
Vidhan Sabha Opinion Poll : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व्हेत नेमकं काय म्हटलं आहे? ते जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणारा सर्व्हे समोर आला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता
महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याचा अंदाज
Vidhan Sabha Opinion Poll : विधान परिषद निवडणुकीत 9 पैकी 9 जागा जिंकून आणल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत देखील असाच विजय मिळवू असा विश्वास महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे. असे असताना महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणारा सर्व्हे समोर आला आहे. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व्हेत नेमकं काय म्हटलं आहे? ते जाणून घेऊयात. (opinion poll mahayuti big blow in vidhan sabha what about maha vikas aghadi sakal media opinion poll)
ADVERTISEMENT
सकाळ आणि सामने एक ओपिनियल पोल केला आहे. या ओपिनियन पोलनूसार आगामी विधानसभा निवडणुकीत 288 पैकी महायुतीच्या 136 जागा येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 152 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Vidhan Parishad Election : "ठाकरेंची दोन मते फुटली", भाजप नेत्याने टाकला राजकीय बॉम्ब
विधानसभा निवडणुकीत आपली पसंती कोणाला? असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला करण्यात आला होता. या पोलमध्ये महाराष्ट्रातील 48.7 लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे. तर महायुतीला महाराष्ट्रातील 33.1 लोकांनी पसंती दिली आहे. 4.9 टक्के लोकांनी यापैकी नाही हा पर्याय निवडला आहे. तर 13.4 टक्के लोकांनी अद्याप मतं ठरलेलं नाही, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्रातील जनतेची भाजपला पसंती
महाराष्ट्रातील जनता विधानसभेत कोणत्या पक्षाला मतदान करालं? असा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेत भापज पक्षाला महाराष्ट्रातील 28.5 लोकांनी पसंती दिली आहे. भाजपनंतर सर्वांधिक मतंही काँग्रेसला मिळाली आहेत. काँग्रेसला 24 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर लागतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रातील 14 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला 11.7 लोकांनी पसंती दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 06 टक्के मतं मिळाली आहे. आणि शेवटच्या स्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4.2 टक्के लोकांची पसंती आहे.
हे ही वाचा : By Poll Results : भाजपला धक्का, 'काँग्रेस'चा डंका; 13 जागांचे निकाल काय?
विधानसभेत कोणत्या पक्षाला पसंती?
काँग्रेस : 24 टक्के
भाजप : 28.5 टक्के
राष्ट्रवादी शरद पवार : 14 टक्के
राष्ट्रवादी अजित पवार : 4.2 टक्के
शिवसेना एकनाथ शिंदे : 06 टक्के
शिवसेना उद्धव ठाकरे : 11.7 टक्के
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री म्हणून फडणवीस ठाकरेंना समान मतं
महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती दिली आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकसमानच मते मिळाली आहेत. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून 22.4 लोकांनी पसंती दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून 14.5 लोकांनी पसंती दर्शवली आहे. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांपेक्षा जास्त पसंती मिळाली आहे. सुप्रिया सुळे यांना 6.8 टक्के लोकांची पसंती आहे, तर अजित पवारांना 5.3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. शेवटच्या स्थानी 4.7 टक्के लोकांनी नाना पटोले यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणाला पसंती?
एकनाथ शिंदे : 14.5 टक्के
देवेंद्र फडणवीस : 22.4 टक्के
अजित पवार : 5.3 टक्के
उद्धव ठाकरे : 22.4 टक्के
नाना पटोले : 4.7 टक्के
सुप्रिया सुळे : 6.8 टक्के
कसं करण्यात आलं सर्वेक्षण?
या सर्वेक्षणासाठी राज्यभरातून 288 विधानसभा मतदारसंघातून 84529 मतदारांशी संवाद साधण्यात आला. मतदारांची निवड करतांना 48 लोकसभा मतदारसंघांना 288 विधानसभा मतदारसंघात विभागण्यात आले. पुढे शहरी आणि ग्रामीण भागांची प्रभाग आणि जिल्हा परिषद गट अशी विभागणी करण्यात आली. भौगोलिक समतोल राखून संशोधन नमुने निवडण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT