Caste Census : ‘हिंदूंनी त्यांचे हक्क घ्यावेत का?’, जात जनगणनेवर PM मोदींचं मोठं विधान

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Prime Minister Narendra Modi fiercely targeted the Congress over caste census.
Prime Minister Narendra Modi fiercely targeted the Congress over caste census.
social share
google news

PM Modi on Caste Census : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच प्रचाराला वेग आला आहे. मंगळवारी बस्तरच्या जगदलपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला. बिहारच्या जात जनगणनेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या घोषणाबाजीवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. पीएम मोदी म्हणाले, काँग्रेसने वेगळा राग आळवण्यास सुरूवात केली आहे. हे म्हणताहेत की, ‘जितनी आबादी, उतना हक’ (जेवढी लोकसंख्या जास्त, तेवढे अधिकार जास्त). मी म्हणतो की, ‘या देशात जर सर्वात जास्त लोकसंख्या कुणाची असेल, तर ती गरिबांची आहे. त्यामुळे गरिबांचे कल्याण हेच माझे ध्येय आहे.’ (The PM said that Congress wants to divide the country by dividing Hindus)

ADVERTISEMENT

पंतप्रधान म्हणाले की, “काँग्रेस लोकसंख्येनुसार वाटा बोलते. काँग्रेसला हिंदूंमध्ये फूट पाडून देशाचे तुकडे करायचे आहेत. माझ्यासाठी सर्वात मोठी जात ही गरीब आहे आणि माझे सरकार गरिबांच्या कल्याणात गुंतले आहे. गरीब दलित असो वा मागास, गरिबांचं भलं झाले, तर देशाचे भलं होईल.”

काँग्रेसला अल्पसंख्याकांचे हक्क कमी करायचेत का?

मोदी म्हणाले, “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काय विचार करत असतील, असा मला प्रश्न पडला होता. देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे, असे ते म्हणायचे. त्यातही मुस्लिमांचा. पण, आता काँग्रेस म्हणत आहे की, देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार कोणाचा असेल हे लोकसंख्या ठरवेल? मग आता त्यांना (काँग्रेस) अल्पसंख्याकांचे हक्क कमी करायचे आहेत का?”, असा सवाल मोदींनी केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच भाजपने ‘ओबीसी जागर यात्रा’ का काढली?

“लोकसंख्येनुसार होणार असेल, तर पहिला अधिकार कोणाचा असावा? काँग्रेसवाल्यांनी खुलासा करावा. काँग्रेसला अल्पसंख्याकांना हटवायचे आहे का? त्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंनी पुढे येऊन त्यांचे सर्व हक्क घ्यावेत? मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की काँग्रेस पक्ष आता काँग्रेसवाले चालवत नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हे सगळं बघून ना त्यांना विचारलं जातं, ना बोलायची हिंमत. आता काँग्रेस आऊटसोर्स झाली आहे. काँग्रेस आता अशा लोकांकडून चालवली जात आहे, लोक पडद्यामागे असे चमत्कार करत आहेत, ज्यांची देशविरोधी शक्तींशी मिलीभगत आहे”, असा हल्ला मोदींनी काँग्रेसवर जातगणनेवरून चढवला.

हेही वाचा >> Pasmanda Muslim: ‘या’ मुस्लिम मतांवर BJP चा डोळा का? PM मोदींची रणनीती नेमकी काय?

पीएम मोदी म्हणाले, “काँग्रेसवाले खाणीतून जो माल वापरत होते, त्याला मोदींनी कुलूप लावले आहे, त्यामुळे त्यांचा संघर्ष सुरू आहे. आजही ते खोटी माहिती पसरवतात, पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे येऊन त्यांना चपराक लगावली आहे.” पंतप्रधानांनी आज छत्तीसगडमध्ये सुमारे 27,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण केले आणि परिवर्तन संकल्प रॅलीला संबोधित केले.

ADVERTISEMENT

‘आदिवासींसाठी पाचपट अधिक बजेट’

यावेळी पीएम मोदी म्हणाले, “काँग्रेसने बस्तरकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी कधीही जनतेच्या हिताचा विचार केला नाही. भाजपने येथे अनेक विकासकामे केली आहेत. काँग्रेसच्या तुलनेत भाजप इथल्या आदिवासींसाठी पाचपट अधिक बजेट देते. त्यांनी 1 रुपया दिला तर आम्ही 5 रुपये आणि त्यांनी 100 रुपये दिले तर आम्ही 500 रुपये देतो. काँग्रेसने येथे ‘खोटा प्रचार आणि घोटाळ्याचे सरकार’ दिले आहे. छत्तीसगडमधील विकास काँग्रेसच्या पोस्टर्स आणि बॅनरमध्ये किंवा नेत्यांच्या तिजोरीत दिसतो. काँग्रेसने छत्तीसगडला काही दिले असेल तर तो खोटा प्रचार आणि घोटाळा सरकार आहे. त्यामुळेच आज छत्तीसगडच्या कानाकोपऱ्यातून आवाज येत आहे- और नही साहिबो, बादल के रहिबो (आम्ही यापुढे सहन करणार नाही, बदलून जगू).”

ADVERTISEMENT

छत्तीसगड-राजस्थानमध्ये स्पर्धा

पंतप्रधान पुढे म्हणाले, “भाजप सरकारने स्वतः 15 नोव्हेंबर म्हणजेच भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आदिवासी दिवस म्हणून घोषित केला. आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीतही आम्ही दुप्पट वाढ केली आहे. छत्तीसगडमध्ये अवघ्या ५ वर्षात काँग्रेसने जी स्थिती निर्माण केली आहे, ते संपूर्ण देश पाहत आहे. आपल्या आमदार आणि मंत्र्यांच्या कारवायांमुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे. छत्तीसगडमध्ये गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. कधी कधी असे दिसते की छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक खून कुठे होतात, कुठे सर्वाधिक लूटमार होते, कुठे सर्वाधिक महिलांवर अत्याचार होतात. दोन्हींमध्ये स्पर्धाच सुरू आहे”, असं मोदी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT