PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्धार, लाल किल्ल्यावर घोषणांचा पाऊस, म्हणाले; "२०३६ चं ऑलिम्पिक..."

मुंबई तक

ADVERTISEMENT

PM Narendra Modi
PM Narendra Modi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

 ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

point

लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींंनी तमामा देशवासीयांना केलं संबोधीत

point

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर मोदींनी केला कौतुकाचा वर्षाव

PM Narendra Modi Speech On Olympic 2024 : दिल्ली : देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लाल किल्ल्यावर दिमाखदार सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात मोदींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या असून तमाम देशवासीयांना संबोधीत केलं आहे. संपूर्ण जगभरात ऑलिम्पिक स्पर्धेचा गाजावाजा सुरु आहे. भारतीय खेळाडूंनीही पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशातच मोदींनी भारतीय खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली असून ऑलिम्पिक २०२६ च्या आयोजनाबाबत मोठं विधान केलं आहे. भारतात मोठ्यात मोठे कार्यक्रम आयोजन करण्याची ताकद आहे. २०३६ चं ऑलिम्पिक भारतात व्हावं, यासाठी आम्ही तयारी करत आहोत. आम्ही पुढे जात आहोत, असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले. (On the occasion of the 78th Independence Day in India, a grand ceremony is being held at the Red Fort under the leadership of Prime Minister Narendra Modi. In this ceremony, Modi has made many important announcements and has addressed all the countrymen)

जनतेला संबोधीत करताना पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

माझ्या देशातील सर्व खेळाडूंना मी १४० कोटी देशवासीयांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आपण नवीन स्वप्न, संकल्पांची पूर्तता करण्यासाठी पुढे जाणार आहोत. भारताने जी-२० चं आयोजन केलं. देशातील प्रत्येक शहरात याचं आयोजन करण्यात आलं. संपूर्ण देशात जी-२० चा इतका मोठा कार्यक्रम झाला नव्हता, पण यावेळी झाला. यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, भारतात मोठ्यात मोठे कार्यक्रम आयोजन करण्याची ताकद आहे. २०३६ चं ऑलिम्पिक भारतात व्हावं, यासाठी आम्ही तयारी करत आहोत. आम्ही पुढे जात आहोत. 

हे ही वाचा >> Independence Day 2024: विकसित भारतासाठी खास प्लॅन! PM मोदींच्या नव्या संकल्पात नेमकं काय?

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मोदींनी केलं मोठं विधान

आपल्या देशात जे समाज आणि क्षेत्र मागे राहिले आहेत, जे लोक मागे राहिले आहेत, छोटे-मोठे शेतकरी, जंगलात राहणारे माझे आदिवासी बांधव, कामगार या सर्वांना आम्हाला आपल्या सोबत घेऊन पुढे निघायचं आहे. त्यामुळे आपली ताकद वाढेल. १८५७ च्या उठावाच्या आधी आपल्या देशातील एका आदिवासी युवकाने इंग्रजांची दमछाक केली होती. २०-२२ वर्षांचं असताना त्याने इंग्रजांच्या नाकी नऊ आणलं होतं. आज त्यांची भगवान बिरसा मुंडा म्हणून लोकं पुजा करतात. भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती येत आहे. हे आमच्यासाठी प्रेरणास्तोत्र होईल. या जयंतीच्या निमित्ताने समाजाप्रती प्रेम आणि आपुलकीची भावना वाढवण्याचा प्रयत्न असेल. समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढं जायचं आहे. 

 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Independence Day PM Modi Speech LIVE : मेडीकल शिक्षणासंदर्भात पीएम मोदींकडून महत्त्वाची घोषणा


आम्ही संकल्पासोबत खूप पुढे जात आहोत. पण काही लोकांना आपला विकास पाहता येत नाही. काही लोकांना भारताच्या भल्याचा विचार करता येत नाही. जोपर्यंत स्वत:चं भलं होत नाही, तोपर्यंत त्यांना कुणाचंही भलं चांगलं वाटत नाही. अशा विचारांच्या लोकांपासून देशाचं संरक्षण करायलं हवं. निराशेत बुडालेल्या लोकांमध्ये विकृती आल्यावर ते विनाशाचं कारण ठरतात. त्यामुळे देशाचं खूप मोठं नुकसान होतं आणि त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. त्यांच्या पोटात विकृती वाढली आहे. ही विकृत विनाश करण्याचं स्वप्न पाहत आहे. देशाला हे समजून घ्यावं लागेल. पण मला देशवासीयांना सांगायचं आहे की, आपण चांगल्या नीतीनं आणि प्रामाणिकपणे विरोधकांचं मन जिंकून देशाला पुढे नेण्याच्या संकल्पात कधीही मागे राहणार नाही, असा मला विश्वास आहे. अनेक आव्हाने आहेत. आव्हाने जवळ आहेत. आव्हाने बाहेरही आहेत. आपण जस जस ताकदवान बनू, त्यानंतर आव्हानही वाढणार आहेत. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT