Prakash Ambedkar : ''अजित पवार महायुतीतुन बाहेर पडले, तरच...'', आंबेडकरांचं मोठं राजकीय विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

prakash ambedkar big reaction on third alliance ajit pawar has left the grand alliance
आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीबाबत सूचक विधान केले.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जरांगेंनी विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची घोषणा केली आहे.

point

जरांगेंनी आता निवडणुकीच्या तयारीला लागायला हवं,

point

आपल्या घोषणेची पूर्तता त्यांनी केली पाहिजे.

Prakash Ambedkar On Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे. मात्र असे असले तरी राज्यात तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. या तिसऱ्या आघाडीत कोण कोण असणार आहे? याबाबत अद्याप स्पष्टता आली नसली तरी चर्चा खूप सूरू आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी मोठं विधान केले आहे. (prakash ambedkar big reaction on third alliance ajit pawar has left the grand alliance)  

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीबाबत सूचक विधान केले. ''अजित पवार हे जोपर्यंत भाजपसोबत आहेत, तोपर्यंत तिसरी आघाडी शक्य नाही. म्हणजेच अजित पवार जर महायुतीतून बाहेर पडले तरच तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं त्यांनी सुचवलं आहे. मनोज जरांगेंवर बोलताना आंबेडकर म्हणाले की, "जरांगेंनी विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं त्यांनी आता निवडणुकीच्या तयारीला लागायला हवं, आपल्या घोषणेची पूर्तता त्यांनी केली पाहिजे.

हे ही वाचा : Pune News : सुप्रिया सुळे अजित पवारांवर कडाडल्या, पुण्यातल्या बैठकीवर काय म्हणाल्या?

महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला

दरम्यान याआधी देखील प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षासोबत मैत्री करण्याची ऑफर दिली होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे. आम्ही स्वबळावर लढणार आहोत. अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत, असे म्हणत आहे. वंचितकडे जातो असे सांगत आहेत. आम्हाला थांबवायचे असेल तर सीट वाढवा असे सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावे. त्यांचे राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो, असे मोठे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Pune News : मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 3 वर्षापासून बेपत्ता व्यक्तीचा फोटो, कुटुंबियांना बसला हादरा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT