महाराष्ट्रातील 'राज'कारण पडद्यावर झळकणार? राज ठाकरेंचा बायोपिक येणार? 'त्या' फोटोमुळं चर्चांना उधाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Raj Thackeray Biopic
Raj Thackeray Biopic Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंचं राजकारण पडद्यावर झळकणार?

point

अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या व्हायरल फोटमुळं चर्चांना उधाण

point

तेजस्विनी पंडित चित्रपटात कोणती भूमिका साकारणार?

Raj Thackeray Biopic: कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रासह राजकारणात नावलौकीक मिळवलेल्या नेत्यांचे बायोपिक तयार करण्यातही अनेक दिग्दर्शकांना रस आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे'' चित्रपटानं सिनेविश्वात अक्षरक्ष: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींचा गल्ला जमवला होता. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बायोपिकचीही तुफान चर्चा रंगू लागली आहे. कारण राज ठाकरे यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे एक गृहस्थ अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्यासोबत चर्चा करत असल्याचं एका फोटोच्या माध्यमातून समोर आलं आहे. त्यामुळे सिनेविश्वासह राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. राज ठाकरे यांच्या बायोपिकबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीय. पण व्हायरल झालेल्या त्या फोटोमुळं चर्चांना उधाण आलं आहे. (The film 'Thackeray' had created a sensation in the cinema world. This film also collected crores at the box office. Similarly, the biopic of Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray is also being discussed)

ADVERTISEMENT

तेजस्विनी पंडित चित्रपटात कोणती भूमिका साकारणार?

राज ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण केल्यास त्यात राजकारणातील कोणते पैलू दाखवण्यात येतील? कोणता अभिनेता राज ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारणार? तर चित्रपटात तेजस्विनी पंडीत यांची नेमकी काय भूमिका असणार? चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कुणाला दिली जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज ठाकरे महाराष्ट्रासह देशातील राजकारणाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत आक्रमक भूमिका घेताना दिसतात. परंतु, त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमा तयार केल्यास राजकारणीत कोणत्या पैल्लूंवर फोकस केला जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हे ही वाचा >>Mazi Ladki Bahin Yojana In Review Problem: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फक्त 2 मिनिटांत होईल मंजूर, फक्त...

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपट तयार केला अन् संपूर्ण देशात शिवसेनेच्या हिंदुत्त्वाची तोफ धडाडली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले तमाम शिवसैनिक आजही ठाकरे चित्रपटाचा गाजावाजा करतात. परंतु, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे ठाकरे चित्रपटाने सिनेविश्वात धुमाकूळ घातला होता. राज ठाकरे यांच्यावर बायोपिक बनवण्यात आला, तर हा चित्रपटही ठाकरे सिनेमाप्रमाणे सिनेविश्वात गाजणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT