Ravindra Waikar : खासदार वायकर घोटाळ्यातून सुटले! पोलिसांच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ravindra Waikar. (Picture: X/@RavindraWaikar)
Ravindra Waikar. (Picture: X/@RavindraWaikar)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी भूखंड प्रकरणातून सुटका

point

मुंबई पोलिसांनी सी समरी रिपोर्ट न्यायालयात दाखल केला

point

मुंबई महापालिकेने अर्धवट माहिती आणि गैरसमजातून तक्रार केली

Ravindra Waikar : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असताना झालेल्या आरोपांच्या फैरीतून खासदार रवींद्र वायकर लवकरच मुक्त होणार आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या आरोपांतून क्लीन चिट दिली आहे. पोलिसांनी सी समरी रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. त्यात धक्कादायक कारण पोलिसांनी दिले आहे. (Mumbai Police’s Economic Offences Wing (EOW) filed a closure report in a Jogeshwari land case registered against Ravindra Waikar, his wife Manisha Waikar and four close associates)

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सी समरी रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. गुरुवारी (4 जुलै) हा रिपोर्ट सादर करण्यात आला असून, आता कोर्टाने तो स्वीकारला तर वायकर प्रकरणातून मुक्त होतील. 

रवींद्र वायकरांना क्लीन चिट का?

जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेने सी समरी रिपोर्ट न्यायालयात दाखल केला असून, मुंबई महापालिकेने अपूर्ण माहिती आणि गैरसमजातून तक्रार दिली होती, असे म्हटले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एका पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, क्लोजर रिपोर्ट गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आला. आता आम्ही पुढील निर्देशाची वाट बघत आहोत.

हेही वाचा >> सोमय्यांनी काढलेल्या वायकर, जाधवांच्या घोटाळ्यांचं पुढे काय झालं?

मुंबई महापालिकेतील संबंधित अथॉरिटी आणि आरोपी यांचे जबाब नोंदवण्यात आले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेकडील कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात असे दिसले की, डीसीपीआर अंतर्गत वायकर आणि इतर आरोपींनी हॉटेल बांधण्याची घेतलेली परवानगी हे गुन्हेगारी स्वरुपाचे नसून, प्रशासकीय तक्रार आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. 

ADVERTISEMENT

आरोपींना यात कोणत्याही प्रकारचा लाभ झाल्याचेही यात अद्याप निष्पन्न झालेले नाही, असेही अधिकाऱ्यांने सांगितले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana : चुका टाळा! 1500 रुपये मिळवण्यासाठी कसा भरायचा अर्ज? 

मुंबई महापालिकेचे उप अभियंता संतोष मांडवकर यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती. त्यावरून रवींद्र वायकर, त्यांची पत्नी मनीषा वायकर, व्यावसायिक भागीदार असू नेहलनाई, राज लालचंदानी, प्रिथिपाल बिंद्रा आणि अरूण दुबे यांच्यावर गु्न्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आझाद मैदान पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. 

किरीट सोमय्यांनी काय केले होते आरोप?

रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारी २०२३ मध्ये आरोप केले होते. फसवणूक करून परवानगी घेतली आणि पंचतारांकित हॉटेल बांधल्याचे आणि ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. 

मुंबई महापालिकेने जून २०२३ मध्ये परवानगी नाकारली आणि गुन्हा दाखल केला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण गेले. ऑक्टोबर २०२३ मध्येच ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा >> 'वायकरांनी अटक टाळण्यासाठी उमेदवारी घेतली', शिंदेंच्याच नेत्याने टाकला बॉम्ब

जानेवारी २०२४ मध्ये ईडीने वायकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर धाडी टाकल्या. दरम्यान, त्याचवेळी वायकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू असताना मुंबई महापालिकेने सुप्रीम कोर्टात सांगितले की, आम्ही वायकरांच्या हॉटेलला दिलेल्या परवानगीबद्दल पुनर्विचार करत आहोत. 

मार्च २०२४ मध्ये वायकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मे २०२४ मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले. जून २०२४ मध्ये ते मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ४८ मतांनी विजयी झाले. त्यानंतर आता याच प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना क्लीन चीट दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT