Chhagan Bhujbal : भुजबळ ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? राऊतांनी दिली मोठी बातमी

विक्रांत चौहान

Sanjay Raut Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ नाराज आहेत, ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जातील अशा चर्चा आहेत... या चर्चांवर संजय राऊत यांनी भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

छगन भुजबळ, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत.
छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. (संग्रहित छायाचित्र)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार?

point

खासदार संजय राऊत यांनी भुजबळांच्या प्रवेशाबद्दल काय सांगितलं?

point

शिवसेना युबीटी नेते आणि भुजबळांची चर्चा झाली का?

Sanjay Raut On Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. ठाकरेंच्या दोन नेत्यांसोबत भुजबळ यांची चर्चा झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले गेले. पण, याबद्दल सस्पेन्स अखेर खासदार संजय राऊत यांनी संपवला. (Sanjay Raut's reaction to the buzzing of Chhagan Bhujbal joining Shiv Sena)

राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळाल्यानंतर भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चेला तोंड फुटलं आहे. भुजबळ मांडत असलेल्या भूमिकांमुळेही या चर्चेला हवा मिळत आहे. त्यातच भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. काही नेत्यांसोबत भुजबळांची चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोललं जात आहे. 

छगन भुजबळांसोबत शिवसेनेची (UBT) चर्चा झाली का? राऊतांनी दिले उत्तर

जेव्हा माध्यम प्रतिनिधींनी मुंबईत संजय राऊत यांना याबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले की, "कालपासून जोरात अफवा सुरू आहेत की, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते कोणत्या वाटेने येताहेत, ही वाट आम्हाला काही दिसली नाही."

हेही वाचा >> फडणवीस सरकारमध्ये राहणार की जाणार? दिल्लीत झाला मोठा निर्णय 

संजय राऊत पुढे म्हणाले की, 

"छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते. त्याला एका कालखंड लोटला. भुजबळ त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बराच काळ राहिले. सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांचा मोठा प्रवास आहे. त्यांच्या प्रवासात आता शिवसेना खूप मागे राहिली आहे आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेली आहे महाराष्ट्रात."

ठाकरे भुजबळांना शिवसेनेत घेणार की नाही?

राऊत म्हणाले, "तुम्ही जे म्हणत आहात, त्या बातमीत कोणतेही तथ्य नाही. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही. झालेला नाही. होण्याची शक्यता नाही. त्यांनी स्वतःच एक मार्ग निवडला आहे. त्यांच्या काही भूमिका आहेत. त्या भूमिकांशी शिवसेनेची भूमिका मेळ खाणार नाही. हा पहिला प्रश्न", असे सांगत राऊतांनी भुजबळांना शिवसेनेत घेतले जाणार नाही, हेच अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >> अमोल कीर्तिकर 1 मताने होते आघाडीवर, मग 48 मतांनी कसे झाले पराभूत? 

"छगन भुजबळ येणार, तो जाणार अशा प्रकारच्या बातम्या पेरून महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या गोंधळ उडवायचा... या बातम्यांना आम्ही महत्त्व देत नाही. छगन भुजबळ यांना आमच्याकडून कुणीही भेटलेलं नाही. भुजबळांना कोणताही नेता भेटलेला नाही. चर्चा झाली नाही. होणार नाही", असे राऊत म्हणाले.  

हे वाचलं का?

    follow whatsapp