‘…म्हणून उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची’, अजित पवारांनी खरं काय ते सांगून टाकलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

separate chair for uddhav thackeray in the meeting in chhatrapati sambhajinagar
separate chair for uddhav thackeray in the meeting in chhatrapati sambhajinagar
social share
google news

Uddhav Thackeray Chair: मुंबई: देशात नाही तर संपूर्ण जगात आजवर कायमच ‘खुर्ची’साठी राजकारण झालेलं आपल्याला माहितीए. खुर्ची मिळविण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी सत्ताधारी नेहमीच वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. असं असताना आता मात्र, विरोधकांमधीलच एका ‘खुर्ची’वरुन सध्या राजकारण (Politics) रंगलं आहे. ज्याबाबत स्वत: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. आता ती खुर्ची आणि त्याभोवती रंगलेलं नेमकं राजकारण काय हे आधी आपण समजून घेऊयात. (separate chair for uddhav thackeray in the meeting in chhatrapati sambhajinagar now ajit pawar gave an explanation about why it was given)

ADVERTISEMENT

‘ती’ खुर्ची अन् रंगलेलं राजकारण…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde0 यांनी उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) बंडखोरी केली आणि त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. हे सरकार ज्या पद्धतीने कोसळलं आणि त्याचा राज्याच्या राजकीय पटलावर उमटलेले तरंग हे आजही आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच राज्यात आलेलं शिंदे-फडणवीस सरकारविरोधात विरोधकांनी व्रजमूठ एकत्र केली आहे.

राज्यातील हे सरकार घालविण्यासाठी जनमत तयार करावं लागेल याची जाणीव झाल्याने विरोधी पक्षातील नेते हे थेट जनतेत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून संयुक्तपणे राज्यभरात जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्याची सुरुवात काल (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरपासून झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अधिक वाचा- सावरकरांना दाढी मान्य नव्हती, डॉ.मिंधे गुळगुळीत फिरणार का? संजय राऊतांचा सवाल

मात्र, या सभेपेक्षा सर्वाधिक चर्चा रंगली ती येथील एका खुर्चीची… होय.. खुर्चीची.. त्याचं झालं असं की, छ. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण यावेळी फक्त उद्धव ठाकरेंसाठी अगदी मधोमध एका वेगळ्या खुर्चीची व्यवस्था करण्यात आली होती. पण यामुळेच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

अधिक वाचा – उद्धव ठाकरेंना भाजप पुन्हा एंट्री देणार? अमित शाहांनी विषय केला क्लिअर

कारण या सभेत मविआचे अनेक दिग्गज नेते हजर होते. अगदी अजित पवारांपासून ते अशोक चव्हाणांपर्यंत.. असं असताना उद्धव ठाकरेंसाठी वेगळी खुर्ची का अशी जोरदार चर्चा रंगली. ज्याबाबत आज स्वत: अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ADVERTISEMENT

पाहा ‘त्या’ खुर्चीबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले:

‘काहींनी अशाही बातम्या दिल्या की, मला तर गंमत वाटते… तुम्हाला माहिती आहे की, पाठीमागच्या काळात काही शारीरिक त्रास उद्धव ठाकरेंना झाला होता मुख्यमंत्री असताना… त्यामुळे आपण बसला आहात त्या पद्धतीने खुर्चीवर न बसता थोडंसं पाठीला ताठ असणारी अशी खुर्ची त्यांना लागते. त्या खुर्चीत ते बसतात.’

ADVERTISEMENT

‘तिथे दोघांच्या बाजूला सोफा ठेवलेले होते. आम्ही तिथे बाकीचे सगळेच होतो. मला ते योग्य वाटलं नाही. मी ते दोन्ही सोफा गेल्या-गेल्या काढायला लावले आणि सांगितलं की, सगळ्यांना सारख्या-सारख्या खुर्च्या टाका. तरी काही वृत्तपत्रांनी बसण्यामध्ये भेदभाव.. असं काही तरी देतात..’

अधिक वाचा – अमित शाह, तुम्ही संगमा, मिंध्येचं काय चाटताय? उद्धव ठाकरेंचा खडा सवाल

‘माझी मीडियाला अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की, असं काही नाही. आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने एकोप्याने सामोरं जातोय. हीच सगळ्याची व्रजमूठ आम्ही सांगतो आहोत ही तीच आहे.. याची पण आपण नोंद घ्यावी.’ असं म्हणत अजित पवारांनी खुर्चीच्या चर्चेवर पडदा टाका असंच सगळ्यांना सुचवलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT