शरद पवार अजित पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक, भेटीमागचं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

nagaland ncp 7 mlas support ajit pawar sharad pawar maharashtra politics
nagaland ncp 7 mlas support ajit pawar sharad pawar maharashtra politics
social share
google news

राज्याच्य़ा राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आले आहे.पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे जयंत पाटील देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. ही बैठकी नेमकी का चर्चा झाली? या बैठकीमागचा काय उद्देश होता? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.मात्र दोन्ही नेत्यांच्या भेटीच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(sharad pawar ajit pawar meet pune in together maharashtra politics)

ADVERTISEMENT

पुण्याचा कोरेगाव पार्कात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याचे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे. प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली. नेमकी किती तास ही बैठक सुरु होती, याची माहिती समोर आली नाही. मात्र या बैठकीला शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील देखील उपस्थित होते,अशी माहिती आहे. बंगल्यावरील अनेक तासांंच्या बैठकीनंतर शरद पवार पहिल्यांदा घराबाहेर पडले. त्यानंतर काही मिनिटांनी अजित दादांच्या गाड्यांचा ताफा घराबाहेर पडला होता. त्यामुळे दोघांमध्ये गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा : Nitin Gadkari: ‘पुण्यात हवेतून चालणाऱ्या बसेस आणणार’, गडकरींनी दादांना सांगितलं; बघून घ्या!

पुण्यात आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अजित पवार पुण्यात होते, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील आणि राजेश टोपे पुण्यात होते. दोन्हीही नेते पुण्यात असल्याने हे बैठक जुळुन आली आहे.गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र यावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.अजित पवार गटाकडून यासाठी शरद पवारांची मनधरणी सुरु आहे. जरी शरद पवार अजित पवारांना पाठिंबा दर्शवत नसले तरी ते छुपा पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे.

हे वाचलं का?

याआधी गेल्या आठवड्यात जयंत पाटील अजित पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अजित पवार यांनी जंयत पाटील यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट घडवून दिल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्तानंतर जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र जयंत पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर हे वृत्त फेटाळून, मी शरद पवारांसोबतच असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

हे ही वाचा :Pune: ‘आम्ही देवालाही सोडत नाही..’, पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवारांची जोरदार फिल्डिंग?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT