Sanjay Shirsat: "संजय राऊतांनी महाराष्ट्राची वाट लावली आणि...", संजय शिरसाटांची राऊतांवर घणाघाती टीका

मुंबई तक

Sanjay Shirsat On Sanjay Raut : "आदित्य ठाकरेला कंटाळून उद्धव साहेब कुठे जातील की उद्धव साहेबांना कंटाळून आदित्य कुठे जातील? त्यांचा आपापसातला तिढा आम्ही सोडवू शकणार नाही"

ADVERTISEMENT

Sanjay Shirsat On Sanjay Raut
Sanjay Shirsat On Sanjay Raut
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"ठाकरे एकमेकांना डुबवायला तयार..."

point

संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केली सडकून टीका

point

मंत्री संजय शिरसाट माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाले?

Sanjay Shirsat On Sanjay Raut : आदित्य ठाकरेला कंटाळून उद्धव साहेब कुठे जातील की उद्धव साहेबांना कंटाळून आदित्य कुठे जातील? त्यांचा आपापसातला तिढा आम्ही सोडवू शकणार नाही. शहाजीबापूंना सांगेल, त्यांच्यामध्ये असलेलं आपसातलं प्रेम त्यात आपल्याला दुफळी माजवायची नाहीय. तेच स्वत: एकमेकांना डुबवायला तयार आहेत, त्यांच्याबद्दल भाष्य न करणं हेच उचित आहे. संजय राऊतमुळे महाराष्ट्राची वाट लागली आहे. देशाची बदनामी करणारा एकमेव नेता संजय राऊत आहे, असं म्हणत शिवेसनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. 

शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा कमी केली आहे, त्यामुळे आमदार नाराज आहेत, यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, शिंदे गटाच्या कोणत्याही आमदाराची सुरक्षा कमी केलेली नाही. ज्या आमदारांना सुरक्षा दिली आहे, ती तशीच आहे. परंतु, मोजके जे काही आमदार आहे, त्यांची सुरक्षा कमी केली आहे. त्यांनी स्वत: म्हणून सांगितलं असेल तर.. परंतु, तसा कोणताही विचार सरकारचा नाही.

हे ही वाचा >>Vijay Wadettiwar: "सगळे भ्रष्टाचारी, सरकार गेंड्याच्या कातडीचे...", हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष होताच वडेट्टीवारांचा हल्लाबोल

पण या व्यतिरिक्त काही लोकांनी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, कार्यकर्त्यांनीही पोलीस बळाची प्रथा सुरु केली होती, त्यांना सरकारने चाप लावलेला आहे. ज्यांना आवश्यक असेल, जे पोलिसांच्या रिपोर्टमध्ये असतील, जे पोलिसांकडून रेकमेंड केले जातील, त्यांना सर्वांना सुरक्षा दिली जाईल. डान्सबार विरोधात मंत्रिमंडळात चर्चा झाल्याची मला माहिती नाहीय. याबद्दल मुख्यमंत्री सांगू शकतील. पण मला असं वाटतं, या महाराष्ट्र राज्यात अशाप्रकारचे बार चालू होणं हे गैर आहे. त्याला कोणीही पाठिंबा देणार नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले. 

हे ही वाचा >> Santsoh Deshmukh Case : "संतोष देशमुख हत्याकांड अवैध संबंधांतून घडलंय असं दाखवण्याचा प्लॅन होता"

रिपोर्टनुसार,डान्सबार संदर्भात नवीन कायदा येत्या अधिवेशनात मांडला जाणार आहे. त्याबाबत आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जुन्या कायद्यात बदल करत नविन तरतुदी या कायद्यात असणार आहेत. डान्सबारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही. डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात राज्य सरकारची परवानगी संदर्भातही बदल करण्यात येणार आहे.सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचे पालन करण्याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डान्स बारच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, काही लोकं आपला अजेंडा चालवत आहेत, कॅबिनेटचा अजेंडा गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे. कॅबिनेटच्या आधी अजेंडा दाखवत आहेत. आपल्या खपासाठी नियम मोडू नका.  

हे वाचलं का?

    follow whatsapp