"गुजरातहून बस आणून महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न"; संजय राऊत संतापले!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न...

point

"...पण हे जास्त दिवस चालणार नाही"

point

मुंबईत सर्व काही आहे... इथूनच लूट होते अन् गुजरातला जाते

Sanjay Raut On Team India Victory Parade Bus : T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची गुरूवारी मरीन ड्राइव्ह ते वानखेडे अशी व्हिक्ट्री परेड काढण्यात आली. आता या मिरवणुकीवरून राजकीय वर्तुळात टीका-टिप्पण्या सुरू झाल्या आहेत. व्हिक्ट्री परेडसाठी "बेस्टच्या ताफ्यात अशी बस असतानाही गुजरातहून बस का आणली?" असा सवाल करत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. (shivsena ubt sanjay raut on team india open deck bus for victory parade which brought from gujrat)

ADVERTISEMENT

टीम इंडियाचे खेळाडू T20 विश्वचषक जिंकल्यानंतर गुरूवारी भारतात आले. दिल्ली आणि मुंबईत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईत तर खेळाडूंसाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. तसंच त्यांच्या व्हिक्ट्री परेडसाठी ओपन बसची तयारी करण्यात आली होती. पण ही बस गुजरातची असल्याचे त्याच्या नंबर प्लेटवरून उघड झाले. मग काय? विरोधकांनी या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधायला सुरूवात केली. 

हेही वाचा : Team India च्या व्हिक्ट्री परेडमध्ये घडलं तरी काय? 10 जण रूग्णालयात दाखल

महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न...

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही यावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "बेस्टच्या ताफ्यात अशा प्रकारच्या बस आहेत. जर नसती तर ती एका रात्रीत बनवून घेतली असती एवढी क्षमता मुंबईत आहे. पण काल वापरलेल्या बसमुळे महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईत सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागतात?" असा प्रश्नही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.

हे वाचलं का?

"...पण हे जास्त दिवस चालणार नाही"

"याआधीही वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय टीम जेव्हा मुंबईत आली होती तेव्हाही बस, गाड्यांचा वापर जल्लोषासाठी केला जात होता. पण काल वापरलेल्या बसमुळे महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. संपूर्ण देशात सर्व काही गुजरात आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. गुजरात आहे म्हणून देश आहे, हे दाखवण्याचा सतत प्रयत्न सुरु आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही. 

हेही वाचा : UK Election: खासदार सुधा मूर्तींचे जावई गमावणार सत्ता?

 

महाराष्ट्र हे औद्योगिक केंद्र आहे. या ठिकाणी सर्व काही आहे. उलट तुम्ही आमच्याकडून शिकला आहात, मुंबई क्रिकेट असोसिएशनने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला हवं होतं. तुमच्या क्रिकेट असोसिएशनच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर अनेक मराठी लोक आहेत. त्यात शिवसेनेचेही लोक आहेत. त्यांनी यावर आक्षेप घ्यायला हवा होता.”, अशा शब्दात संजय राऊत स्पष्टच बोलले.

ADVERTISEMENT

मुंबईत सर्व काही आहे... इथूनच लूट होते अन् गुजरातला जाते

"मुंबईत क्रिकेटपटूंचे आगमन होते. रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे. अनेक खेळाडू हे मुंबई इंडियन्सचे आहेत. मग त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातहून बस आणावी लागते? याद्वारे तुम्ही काय दाखवू इच्छिता? यापूर्वीही अशाप्रकारे उत्सव झाले तेव्हा मुंबईने जोरदार स्वागत केले आहे. बेस्टच्या ताफ्यात अशा प्रकारच्या बस आहेत. जर नसती तर ती एका रात्रीत बनवून घेतली असती, तेवढी क्षमता मुंबईत आहे. खास गुजरातहून बस पाठवण्यात आली. गुजरात आहे म्हणून देश आहे, असे दाखवताय का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : मुंबई स्पिरीट! अलोट गर्दीत रुग्णवाहिकेला करून दिली वाट मोकळी, Video Viral

मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत सर्व काही आहे. मुंबईतूनच पैसा गुजरातला जातो. इथूनच लूट होते आणि तिथे जाते. एक बस आली म्हणून इतकं काही नाही पण यातून वृत्ती दिसते. आमचे गुजराती भाषेशी, समाजाशी काहीही भांडण नाही. हे वारंवार मी सांगितले आहे. मुंबईत मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी मोदी शहांनी लावला आहे. आम्ही तो वाद लावलेला नाही. हा वाद मुंबईत असूच शकत नाही." असं म्हणत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT