Sanjay Raut: महाराष्ट्राची लाडकी बहीण कोण? संजय राऊतांनी मविआच्या मेळाव्यात थेट नावच सांगितलं
Sanjay Raut Speech : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मुंबईत पदाधिकारी मेळावा पार पडला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.अशातच खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यातही योजनेबद्दल मोठं विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे घणाघाती टीका केली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्राची लाडकी बहीण कोण? संजय राऊत म्हणाले...
संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर डागली तोफ
Sanjay Raut Speech : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मुंबईत पदाधिकारी मेळावा पार पडला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.अशातच खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यातही योजनेबद्दल मोठं विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे घणाघाती टीका केली. राऊत म्हणाले, सुप्रियाताई महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. या बहिणीसाठी बारामतीत महाराष्ट्र लढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तुमच्या लाडक्या भावांनी रंग बदलला. ते गुलाबी झाले आहेत. सरडा रंग बदलतो. अचानक गुलाबी कसा होऊ शकतो आणि आता हा पिंक सरडा बारामतीही सोडणार आहे, असं मी ऐकलं आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात राऊत बोलत होते.
ADVERTISEMENT
संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल
सुप्रियाताई महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. या बहिणीसाठी बारामतीत महाराष्ट्र लढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तुमच्या लाडक्या भावांनी रंग बदलला. ते गुलाबी झाले आहेत. सरडा रंग बदलतो. अचानक गुलाबी कसा होऊ शकतो आणि आता हा पिंक सरडा बारामतीही सोडणार आहे, असं मी ऐकलं आहे.हा पिंक सरडा बारामतीही सोडणार आहे, असं मी ऐकलं आहे. कुठे जाणार मला माहित नाही. पण मी सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जीणा नाही. आपला भगवाच आहे. बाजूच्या तेलंगणा राज्यात केसीआरचा गुलाबी रंग आहे, पराभूत झाला. पिंक कधीही जिंकणार नाही. एकतर भगवा जिंकेल, नाहीतर तिरंगा जिंकेल, असं राऊत म्हणाले.
हे ही वाचा >> Indian Hockey Team: "सरपंच साहेबांनी मोठं..."; श्रीजेशच्या निवृत्तीनंतर PM मोदी नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर डागली तोफ
आपली छाती ५६ इंच होती, हे मोदी स्वत: विसरले आहेत. ती छातीच नाहीय, तो माचिसचा रिकामा खोका आहे. त्यात काहीच नाही. नुसती छाती जरी असती, तर देशाची अवस्था अशी झाली नसती. देशाचे प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर भाषण करतात आणि जम्मू काश्मीरमध्ये आमच्या जवानांचं बलिदान होत आहे. गेल्या ५० दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे २७ हल्ले झाले. आमचे १७ जवान शहिद झाले. ५६ जवान घायाळ झाले. १०० च्या वर तिकडचे नागरिक मृत झाले. हे ५६ इंच वाल्यांचं काम नाही. यांना छातीच नाहीय. त्यांच्या उरलेल्या छातीतील हवा आम्ही कालच्या लोकसभा निवडणुकीत काढून टाकली. महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर आपण पूर्ण काढून टाकू, असं म्हणत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला.
हे वाचलं का?
हे ही वचा >>Uddhav Thackeray: महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं
प्रत्येक प्लेयर खेळतोच आहे, आपल्याला काही चिंता नाही. आपण पाचशेच्या वर जात आहोत. मंचावर बसलेली टीम वर्ल्डकप जिंकणारी टीम आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. दिल्लीचा एक कप आपण जिंकला आहे. महाराष्ट्राचाही सामना जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही. आज अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतीथी आहे. आज बनावट भाजप आहे. चोरांचा पक्ष आहे. बोगस पक्ष आहे. आम्ही ज्या भाजपसोबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात गेली २५ वर्षे काम केलं, त्या अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतीथी आहे. आम्ही हार मानणार नाही. आम्ही झुकणार नाही. आम्ही लढत राहू. दिल्लीच्या हुकूमशाही विरोधात नवा महाराष्ट्र उभा आहे, हा महाराष्ट्र कधी झुकणार नाही. हा महाराष्ट्र कधी वाकणार नाही, मोडणार नाही. तुम्हाला मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. हा आजच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याचा खरा मंत्र आहे, असंही राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT