Ajit Pawar : ''अजित दादांसारख्या व्यक्तीमत्वाला तोंड लपवून...'', ठाकरेंच्या नेत्याची बोचरी टीका
Ambadas Danve News: भाजपसोबत सत्तास्थापन करण्यासाठी मी अमित शहांसोबत 10 बैठका केल्या. या बैठकांना जाण्यासाठी मला तोंडाला मास्क व टोपी घालून जावे लागायचे, असा खुलासा खुद्द अजित पवार यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केला. दादांच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्ष नेते दानवे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भाजप कायम कूटनीतीचे राजकारण करत आली
भाजपची खालच्या स्तराची मानसिकता आह
नारायण राणे यांना किती पक्ष किंमत देतो हे पाहावे.
Ambadas Danve Criticize Ajit Pawar : महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला मास्क आणि टोपी घालून वेष बदलून दिल्लीला जायचो, असा खुलासा अजित पवारांनी (Ajit Pawar) दिल्लीत केला आहे. अजित पवारांच्या याच विधानावर आता विरोधकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. ''अजितदादा यांच्यासारख्या परखड व्यक्तिमत्त्वाला जर तोंड लपवून जावे लागतं असेल तर हे अतिशय वाईट आहे'', अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. (thackeray leader ambadas danve criticize ajit pawar on delhi amit shah secret meeting maharashtra pokitics)
ADVERTISEMENT
भाजपसोबत सत्तास्थापन करण्यासाठी मी अमित शहांसोबत 10 बैठका केल्या. या बैठकांना जाण्यासाठी मला तोंडाला मास्क व टोपी घालून जावे लागायचे, असा खुलासा खुद्द अजित पवार यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केला. दादांच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्ष नेते दानवे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.''अजितदादा यांच्यासारख्या परखड व्यक्तिमत्त्वाला जर तोंड लपवून जावे लागतं असेल तर हे अतिशय वाईट आहे. हा एक प्रकारचा स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखा प्रकार आहे'', अशी खोचक टीका अंबादास दानवे यांनी केली.
हे ही वाचा : Yashshree shinde : यशश्रीच्या मृतदेहाचे कुत्रे तोडत होते लचके; पोलीस पोहोचले त्यावेळी काय दिसलं?
अंबादास दानवे पुढे म्हणाले, भाजप आतापर्यंत कायम कूटनीतीचे राजकारण करत आली आहे. त्यांची किती खालच्या स्तराची मानसिकता आहे, हे वेळोवेळी दिसून आले आहे. कोर्टाने देशमुख यांच्यावर स्पष्ट भुमिका दिली आहे. दृष्टपणाचे हे वागणे भाजपचेच असल्याचेही अंबादास दानवे म्हणाले.
हे वाचलं का?
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्याच्या राजकरणात मोठ्या घडामोडी घडत आहे. अशातच जागावाटपात महायुती मध्ये वाद निर्माण झाल्याच्या चर्चा आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपली भुमिका ठरवत असतो आणि ते नेते ठरवत असतात. नारायण राणे यांना किती पक्ष किंमत देतो हे पाहावे. त्यांनी बाकी अजित दादा आणि आमच्या गद्दारांना किती तुकडे टाकतात, ते पाहावे लागेल. असेही ते म्हणाले.
दरम्यान लव्ह जिहाद प्रकरणावरुन दानवे यांनी नितेश राणे यांच्यावर देखील निशाणा साधलाय. माझे नितेश राणे यांना आव्हान आहे की असे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई करा. राज्यात आणि देशात तुमचे सरकार आहे. असे असताना कारवाई होत नसेल तर याचा अर्थ म्हणजे तुम्ही प्रोत्साहन देताय का? तुम्ही तुमच्या राज्यात यावर कारवाई करा, असेही दानवे म्हणाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Mahendra Thorve : "राष्ट्रवादीकडून पाठीत वार करण्याचे काम सुरू", महायुतीत संघर्ष
अजित पवार काय म्हणाले?
मास्क आणि टोपी घालून वेष बदलून दिल्लीला जायचो. सत्ता नाट्यावेळी दहा वेळा गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली असे अनेक खुलासे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहेत. निती आयोगाच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दिल्लीत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ''सत्तानाट्यावेळी अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये एकूण दहा बैठका झाल्या. यासाठी अजित पवार सामान्य विमानाने प्रवास करत होते. मास्क आणि टोपी घालून दिल्ली-मुंबई, मुंबई-दिल्ली असा प्रवास करत होते. त्यांच्या या वेषभूषेमुळे सह प्रवासी सुद्धा आपल्याला ओळखत नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT