Uddhav Thackeray: महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण?

point

उद्धव ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ

point

उद्धव ठाकरे मविआच्या मुख्यमंत्रीपदाबाबत नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray Speech : माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं हित आम्ही जपू. मला उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली, तरीही चालेल. पण यांना खली खेचू. आपल्यात काड्या घालणारे लोक त्यांच्या युतीत बसले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार की आणखी कोण होणार? सर्वांसमोर मी स्पष्ट सांगतो, पृथ्वीराजजी, पवार साहेब तुम्ही आलात, आताच तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्रीपदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल. मी माझ्यासाठी लढतो आहे, ही भावना माझ्या मनात नाही, असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते मुंबईत महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते. (Who is the face of Chief Minister? Uddhav Thackeray will be or who else will be? I say clearly in front of everyone, Prithvirajji, Pawar sir, you have come, announce the post of Chief Minister of any one of you now, Uddhav Thackeray will support him)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री पद सोडलं. मी पुन्हा लढतोय ते स्वत:च्या स्वार्थासाठी लढत नाही. माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय. महाराष्ट्राला झुकवण्याची जो हिंमत करतो. त्याला आम्ही गाडून टाकू. या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची आहे. मुख्यमंत्री कोण होणार? हे सगळं सुरु आहे. आता जाहीर करा, मी तुम्हाला पाठिंबा देतोय की नाही, ते सर्वांना समजेल. भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचा जो अनुभव आम्ही घेतला आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची नाही. आम्ही ३० वर्ष सेना-भाजप युती होती. जागावाटप व्हायचं आणि अशाच बैठका व्हायच्या. बैठकांमध्ये जाहीर केलं, ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री. हेच धोरण आम्ही एकमेकांच्या पायावर धोंडे पाडण्यासाठी टाकायचो. पाडापाडीच्या राजकारणा युतीला काय महत्व राहिलं? आधी ठरवा मग चला पुढे, मला काही हरकत नाही. पण या धोरणाने जाऊ नका. 

हे ही वाचा >> महाराष्ट्रातील 'राज'कारण पडद्यावर झळकणार? राज ठाकरेंचा बायोपिक येणार? 'त्या' फोटोमुळं चर्चांना उधाण

"महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची ही लढाई"

लोकसभेत राजकीय शत्रूंना पाणी पाजलच आहे. लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणाची लढाई होती. लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. आताची लढाई महाराष्ट्र धर्म रक्षणाची आहे. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची ही लढाई आहे. हे महाराष्ट्र लुटायला आले आहेत. लढाई लढायची तर कशी लढायची, एकतर तू राहशील नाहितर मी राहिल, या जिद्दीने लढाई लढली पाहिजे. हे फक्त आपल्या मित्रपक्षात नको. जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत, त्यांना आपण हे सांगत आहोत. एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील, होऊन जाऊदे. 
बऱ्याच दिवसांपासून आमच्या तिन्ही पक्षांची आणि मित्र पक्षांची एकत्र बैठक घेण्याचं ठरत होतं, पण मुहूर्त लागत नव्हता. आजा तो योग जुळून आला आहे. कालच स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. आजपासून आपण पुढच्या लढाईची सुरुवात करत आहोत. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. त्यांनी आज महाराष्ट्राची निवडणूकच जाहीर करावी, आमची तयारी आहे. तयारी आहे, हे बोलायला खूप सोपं आहे. पण वाटते तितकी लढाई सोपी नाहीय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना! कांदिवलीच्या शाळेत ११ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग, शिक्षकावर गुन्हा दाखल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT