"ती शिवसेना नाही, गद्दारांची सेना, निष्ठावंत शिवसैनिक...", उद्धव ठाकरेंचा DCM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
Uddhav Thackeray Press Conference : काँग्रसेचे नेते किरण काळे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. काळे यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा

"गद्दार सेनेत गेलेल्यांबद्दल मी काही..."

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray Press Conference : काँग्रसेचे नेते किरण काळे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. काळे यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, "ती शिवसेना नाही..ती त्यांची गद्दार सेना आहे. गद्दार सेनेत गेलेल्यांबद्दल मी काही बोलत नाही. माझ्यासोबत माझी जुनी माणसं आहेत. ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेलो नाही. हे संपूर्ण राज्यभर आहे. उत्तर प्रदेशमधील शिवसैनिकांचेही फोटो आले आहेत. हातात मशाल घेऊन तेही तिकडे बैठका घेत आहेत. ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत. त्यांची निष्ठा तर आमच्यासोबत आहेच आणि किरणजींसारखे चांगले लढवय्ये कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. जबाबदारी आता हीच आहे की, एकूण हा अंदाधूंद कारभार राज्यातच नव्हे देशातच माजलेला आहे. त्यांना दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदूत्व, आपलं राष्ट्रीयत्व यांचं रक्षण करणं आणि जनतेची जी काही नाराजी आणि व्यथा आहे, त्याला फसवलं गेलंय. त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे क्षण आणून देणं ही सर्वात मोठी जबाबदारी सर्वांची आहे"
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "आज गाडगेबाबांचही स्मरण करायला पाहिजे. गाडगेबाबांनी सांगितलंय, धर्म हा जगायचा असतो. मी मुख्यमंत्री असताना गाडगेबाबांनी जी दशसुत्री सांगितली आहे, तो खरा धर्म. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं शिकवलेलं नाही. जे या देशाला आपलं मानतात ते आपलं आहेत. ज्यांनी धर्माचा सगळा खेळखंडोबा केलेला आहे. त्यांचं राजकारणापुरतं, मुस्लिम प्रेम कसं आहे, याचेही दाखले मी देऊ शकतो. मोदींजीचे थोरले बंधू का धाकडे बंधू ते कोण बंधू आहेत, ते त्यांनी दाखवलेलं आहे. त्यांच्याबद्दल मोदींनी फार आपुलकीने आणि प्रेमाने ट्वीट केलेलं आहे. ही निवडणुकीसारखी धर्मांधता माजवत आहेत, हा धर्म देशाला चांगल्या दिशेनं नेईल असं मला नाही वाटत".
हे ही वाचा >> Swara Bhaskar : महाकुंभ आणि 'छावा' बद्दलच्या पोस्टमुळे वाद, स्वरा भास्कर स्पष्टीकरण देताना म्हटली...
"माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंच रक्षण करणं, न्यू इंडिया बँक कोणामुळे बुडाली आहे, यांचं रक्षण करणं हे भाजपचं हिंदूत्व आहे का? माझ्या हिंदूत्वाची व्याख्या काहीतरी आहे. भाजपच्या हिंदूत्वाची व्याख्या काय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. आता न्यायालयाने सुद्धा तत्परता दाखवण्याची गरज आहे. आमच्या बाबतीत तीन वर्ष होऊन गेली तरी तो निकाल लागतोय. तीन-चार न्यायाधीशांची कारकिर्द त्यात पूर्ण झाली. तरीसुद्धा तो निकाल लागलेला नाहीय. निकाल लागलाय तर किमान ती प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी, अशी मागणी केली तर त्यात गैर काय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.