’70 कोटींचं काय झालं’, उद्धव ठाकरे तापले! ‘कलंक’वरून मोदींवरही चढवला हल्ला
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा नागपूरसाठी कलंक असा उल्लेख केला आणि वादाची ठिणगी पडली. हा वाद आता वाढला असून, भाजपकडून ठाकरेंवर टीकेची झोड उठवण्यात आलीये.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : कलंक नावाचा चित्रपट फ्लॉप झाला, पण कलंक शब्दाने महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच वादळ उठवलंय. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा नागपूरसाठी कलंक असा उल्लेख केला आणि वादाची ठिणगी पडली. हा वाद आता वाढला असून, भाजपकडून ठाकरेंवर टीकेची झोड उठवण्यात आलीये. याच मुद्द्यावरून ठाकरे तापले आणि त्यांनी भाजपला उलट सवाल केला.
ADVERTISEMENT
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाल्या, “त्याचं एवढं लागण्यासारखं काय, ज्यांना माझा शब्द लागला. त्यांना मला विचारायचं की, तुम्ही दुसऱ्यांवर भ्रष्टाचार आरोप करता तेव्हा तुम्ही कलंक लावत नाही का? तू भ्रष्ट आहेस, तुझं कुटुंब भ्रष्ट आहे, तो भ्रष्टाचाराचा कलंक तुम्ही लावत नाही का?”, असा सवाल ठाकरेंनी केला.
मुश्रीफांवर आधी आरोप, नंतर मंत्रिमंडळात स्थान
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन आक्रोश केला होता. अशा धाडी टाकण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून ठार करा. मग तेच मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. आम्हाला जे बोलत होते की, बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. मला आज कळलं की यांनाही मांडी आहे. तुम्ही म्हणाल तो माणूस भ्रष्ट आणि तुम्ही त्याला मंत्रिमंडळात स्थानही देता. मग तो भ्रष्ट आहे की, देव आहे? तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हे कुठलं हिंदुत्व?”, असा प्रश्न ठाकरेंनी फडणवीस आणि भाजपला केला.
हे वाचलं का?
वाचा >> Sanjay Mishra: मोदी सरकारला झटका! सु्प्रीम कोर्टाने निर्णय ठरवला बेकायदेशीर
“भ्रष्टाचाराचे आरोप करून त्या माणसांना त्यांच्या कुटुंबांना कलंकित करता. पुन्हा मंत्रिमंडळात घेता. मग ते भ्रष्टाचाराचे आरोप खोटे होते का? मग भ्रष्टाचाराचा कलंक का लावला? माझ्या बोलण्यामुळे कळलं की त्यांनाही थोडं मन आहे”, असा चिमटाही ठाकरेंनी यावेळी काढला.
नितीन गडकरींच्या टीकेवर ठाकरे काय बोलले?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाकरेंनी केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली. त्यावर ठाकरे म्हणाले, “नितीन गडकरींना सुद्धा या अनुभवातून जावं लागलं आहे. कुणाला काही बोलण्याबद्दल मला गमंत वाटतं नाही. पूर्वी मी अफजल खानाची स्वारी असं बोललो होतो. बोलण्याचा हेतू हा होता की, हे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय घराघरांत घुसवताहेत. म्हणजे याचा अर्थ तोच आहे की सामील व्हा, नाहीतर कुटुंबासकट कापून टाकू. ईडी, सीबीआय घरात घुसवल्यानंतर ते कुटुंब कलंकित होत नाही का? तुम्हाला फक्त जाणीव करून दिली, तर तळपायाची आग मस्तकात जाण्याचं कारण काय?”, असा प्रतिप्रश्न ठाकरेंनी भाजप नेत्यांना केला.
ADVERTISEMENT
मोदींना घेरलं, म्हणाले, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस ही भ्रष्टाचारी पार्टी असल्याची टीका केली होती. त्यावर बोट ठेवत ठाकरे म्हणाले, “लोकमान्य टिळक पुरस्कार नरेंद्र मोदींना जाहीर झाला. कुणाच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे, शरद पवारांच्या. मग 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचं काय झालं? व्यासपीठावर कोण कोण असणार आहे? मला काही तारतम्यच कळलं नाही. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न कुणाला विचारायचं? ज्यांच्यावर तुम्ही 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. तो पक्ष आता तुमच्यासोबत आला आहे. शरद पवार तुमच्यासोबत व्यासपीठावर असणार, आमच्यातील मिंधे तुमच्यासोबत असणार, मग लोकांनी बघायचं काय? कोण कुणाला कलंक लावतंय”, असा टोला ठाकरेंनी मोदींना लगावला.
ADVERTISEMENT
ऑपरेशनवरून माझी चेष्टा केली -ठाकरे
“माझं ऑपरेशन झालं. त्यावरून माझी चेष्टा करतात. माझ्या कमरेचा पट्टा सुटला, कुणाच्या गळ्याचा पट्टा सुटला म्हणून चेष्टा करतात. मी असं करत नाही. बोलत नाही. मी जे भोगलं, ते त्यांना भोगावं लागू नये, अशी माझी प्रार्थना आहे. ज्या दिवशी ते भोगतील, त्या दिवशी त्यांना कळेल की ती शस्त्रक्रिया काय आहे. इथपर्यंत तुम्ही खाली जाता. माझं म्हणणं आहे की, ही लोक महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेतच. मी काय चुकीची भाषा वापरली? कलंकचा अर्थ काय होतो? त्यात अर्वाच्य असं काय आहे? ऑपरेशनवरून माझी मजाक उडवताहेत, हे चालतं का? ती कोणती संस्कृती आहे”, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर हल्ला चढवला.
वाचा >> अजित पवार एन्ट्री, शिंदे, फडणवीसांसह BJP च्या मंत्र्यांना बसणार मोठा फटका!
“25 वर्ष सोबत राहिल्यानंतर असं काय घडलं होतं की, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी हिंदूच होतो. आजही हिंदूच आहे. तुम्ही म्हणाल, तो दगड. तुम्ही म्हणाल, तो भ्रष्ट. तुम्ही म्हणाल, तो डाकू. तुम्ही म्हणाल तो देव. तुम्ही म्हणाल, तो संत. पण, तुम्ही जे म्हणाल, ते ऐकायचं असे तुम्ही आहात कोण? पूर्वी बाळासाहेबांकडे एकदा गोड बाबा आले होते. ते ढिगभर मिरच्या खायचे आणि त्या मिरच्या त्यांना गोड लागायच्या. यांनाही (भाजप) मिरच्या गोड लागत आहेत”, असं उपरोधिक भाष्य ठाकरेंनी यावेळी केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT