Uddhav : ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’, पत्रकार परिषदेत काय केला महाखुलासा?
ठाकरे गटाने पत्रकार परिषदेत २०१३ आणि २०१८ घटनादुरूस्तीची निवडणूक आयोगात सादर केलेल्या माहितीचा तपशील यावेळी जाहीर केला. 2013 नंतर राष्ट्रीय कार्यकारीणी जाहीर केली होती.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे याच्या महापत्रकार परिषदेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून टाकली आहे. कारण ठाकरे गटाने या पत्रकार परिषदेत लावरे ते व्हिडिओ माध्यमांसमोर जारी केले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून ठाकरेंनी पक्षाची घटना दुरूस्ती काय झाली होती. तसेच या घटनादुरूस्तीत काय काय निर्णय घेण्यात आले,याचा लेखाजोखाचा मांडला होता. या माध्यमातून ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांचा निकाल त्यांच्या दृष्टीने किती चुकीचा होता. हे मांडण्याचा प्रयत्न केला. (udhhav thackeray maha press conferecne rahul narwekar maharashtra politics mla disqaulification case)
ADVERTISEMENT
ठाकरे गटाने पत्रकार परिषदेत २०१३ आणि २०१८ घटनादुरूस्तीची निवडणूक आयोगात सादर केलेल्या माहितीचा तपशील यावेळी जाहीर केला. 2013 नंतर राष्ट्रीय कार्यकारीणी जाहीर केली होती. 2013 राष्ट्रीय कार्यकारीणीत पक्ष घटना दुरूस्तीचे ठराव मांडले होते.
पहिला ठराव : शिवसेना प्रमुख हे पद बाळासाहेबांनाच शोभून दिसते,म्हणून कुणालाही हे पद नावापूढे जोडता येणार नाही. त्यामुळे शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात येत आहे असा ठराव मंजूर कऱण्यात आला.
हे ही वाचा : Sharad Pawar : “आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी…”, पवार स्पष्टच बोलले
दुसरा ठराव : शिवसेना पक्ष प्रमुख पद पक्षात निर्माण करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख पद हे पक्षाच्या अध्यक्षांकडे असेल त्यांची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल. याची मुदत 5 वर्षाची आहे. तसेच बाळासाहेब यांच्याकडे असलेले सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुखाला देण्यात आली होते,अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे कायद्याने प्रतिनीधींसमोर हा ठराव एकमताने मंजूर झाला. आणि आता पक्षाचे सर्वोच्च अधिकार असलेले पद शिवसेना पक्षप्रमुख हे घटनेत निर्माण झाल्याचे लाव रे तो व्हिडिओत सुभाष देसाईंनी सांगितले
हे वाचलं का?
तिसरा ठराव : पक्षाचे कार्यकारीणी अध्यक्ष पद रद्द करण्यात येत आहे. हा ठराव देखील मंजूर करून कार्यकारीणी अध्यक्ष पद रद्द करण्यात आले.
हे ही वाचा : हास्यजत्रा क्वीन शिवाली परब पडली प्रेमात? हॅशटॅगने चाहत्यांना पाडलं कोड्यात
पक्ष प्रमुख पदासाठी पाच वर्षानंतर कशी निवडणूक घेतली जाते. आणि निवडणूक आयोगाने जे निकष लावले आहेत, त्याप्रमाणे अॅड. बाळकृष्ण जोशी यांनी कार्यकारीणीमध्ये निवडणूक प्रक्रिया पुर्ण केली होती त्याचा व्हिडीओ यावेळी जारी करण्यात आला. शिवसेना पक्ष प्रमुख पदासाठी उद्धव ठाकरे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर करतो, असे या व्हिडिओत बाळकुष्ण जोशी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
राष्ट्रीय कार्यकारीणीची निवडणूक यावेळी पार पडली.कार्यकारीणीसाठी 14 पैकी 9 अर्ज आले होते. या अर्जात मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, लिलाधर ढाके, सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते, संजय राऊत आणि गजानन किर्तीकर या 9 लोकांची राष्ट्रीय कार्यकारीणी निवड करण्यात आल्याचे बाळकृष्ण जोशी यांनी जाहीर केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT