Opinion Poll : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार? भाजपची झोप उडवणारा सर्व्हे

प्रशांत गोमाणे

vidhan sabha election News : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. या संदर्भातला एक खळबळ उडवून टाकणारा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
vidhan sabha election 2024 big blow for mahayuti what aboout mahayuti sakal media opinion poll maharashtra politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार?

point

महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे

point

खळबळ उडवणाऱ्या 'त्या' सर्व्हेत काय?

Sakal Media Opinion Poll : आज पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने 9 पैकी 9 उमेदवार जिंकून आणले होते. या विजयानंतर महायुतीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही असाच करिश्मा करून दाखवण्याच्या तयारीत महायुती आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार येण्याची शक्यता आहे. तर महायुतीला (Mahayuti) मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. या संदर्भातला एक खळबळ उडवून टाकणारा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात. (vidhan sabha election 2024 big blow for mahayuti what aboout mahayuti sakal media opinion poll maharashtra politics) 

विधानसभा निवडणुकीआधी सकाळ मिडीयाने एक ओपिनियन पोल केला होता. या ओपनियन पोलनूसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.तर महाविकास आघाडीला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election Result: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, पाहा संपूर्ण यादी

विधानसभा निवडणुकीत आपली पसंती कोणाला? असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला करण्यात आला होता. या पोलमध्ये महाराष्ट्रातील 48.7 लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे. तर महायुतीला महाराष्ट्रातील 33.1 लोकांनी पसंती दिली आहे. 4.9 टक्के लोकांनी यापैकी नाही हा पर्याय निवडला आहे. तर 13.4 टक्के लोकांनी अद्याप मतं ठरलेलं नाही, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील जनतेची भाजपला पसंती

महाराष्ट्रातील जनता विधानसभेत कोणत्या पक्षाला मतदान करालं? असा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेत भापज पक्षाला महाराष्ट्रातील 28.5 लोकांनी पसंती दिली आहे. भाजपनंतर सर्वांधिक मतंही काँग्रेसला मिळाली आहेत. काँग्रेसला 24 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर लागतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रातील 14 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला 11.7 लोकांनी पसंती दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 06 टक्के मतं मिळाली आहे. आणि शेवटच्या स्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4.2 टक्के लोकांची पसंती आहे. 

विधानसभेत कोणत्या पक्षाला पसंती? 

काँग्रेस : 24 टक्के 
भाजप : 28.5 टक्के
राष्ट्रवादी शरद पवार : 14 टक्के
राष्ट्रवादी अजित पवार : 4.2 टक्के 
शिवसेना एकनाथ शिंदे : 06 टक्के 
शिवसेना उद्धव ठाकरे : 11.7 टक्के 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : काँग्रेसची 5 मतं कशी फुटली? अजित पवारांनी काय सांगितलं?

मुख्यमंत्री म्हणून फडणवीस ठाकरेंना समान मतं

महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती दिली आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकसमानच मते मिळाली आहेत. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून 22.4 लोकांनी पसंती दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून 14.5 लोकांनी पसंती दर्शवली आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणाला पसंती? 

एकनाथ शिंदे : 14.5 टक्के 
देवेंद्र फडणवीस : 22.4 टक्के 
अजित पवार : 5.3 टक्के 
उद्धव ठाकरे : 22.4 टक्के 
नाना पटोले : 4.7 टक्के 
सुप्रिया सुळे : 6.8 टक्के  

 

सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांपेक्षा जास्त पसंती मिळाली आहे. सुप्रिया सुळे यांना 6.8 टक्के लोकांची पसंती आहे, तर अजित पवारांना 5.3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. शेवटच्या स्थानी 4.7 टक्के लोकांनी नाना पटोले यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp