Congress: तुम्हाला माहितेय राहुल गांधींनी लोकसभेत नेमके कोणते पोस्टर दाखवले?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

which posters rahul gandhi displayed in lok sabha do you know now it has come to light
which posters rahul gandhi displayed in lok sabha do you know now it has come to light
social share
google news

Rahul Gandhi Poster: नवी दिल्ली: मणिपूरच्या (Manipur) मुद्द्यावरुन मोदी सरकारविरोधात (Modi Govt) अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. ज्यावर सुरु असलेल्या चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सुरुवातीलाच असं म्हटलं की, मी आधी अदाणींवर बोललो होतो. त्यामुळे अनेकांना त्रास झाला होता. त्यामुळे आज फार बोलणार नाही.. मात्र, आपल्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधींनी काही पोस्टर (Poster) दाखवले. ज्यावेळी कॅमेरा त्यांच्यावरुन हटविण्यात आला होता. ज्यावरून सभागृहात बराच गदारोळही झाला. (which posters rahul gandhi displayed in lok sabha do you know now it has come to light)

ADVERTISEMENT

राहुल गांधींवरुन कॅमेरा हटविण्यात आल्याने त्यांनी सभागृहात नेमके कोणते पोस्टर दाखवले हे सभागृहात उपस्थित असणाऱ्या लोकांशिवाय इतर कोणालाही समजू शकलं नाही. पण राहुल गांधींचं भाषण संपताच याबाबत काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन राहुल गांधींनी सभागृहात नेमके कोणते पोस्टर दाखवले होते. तेच फोटो ट्विट केले.

राहुल गांधींनी सभागृहात दाखवलेले ‘हे’ पोस्टर

“नरेंद्र मोदी भारताचा आवाज ऐकत नाही, तर यांचा आवाज ऐकतात”

हे वाचलं का?

हे बोलत असताना खा. राहुल गांधी यांनी सदनात हे फोटो दाखवले होते.. मात्र त्याचवेळी संसद TV चा कॅमेरा स्पीकर ओम बिरला यांच्यावरच ठेवण्यात आला.

संपूर्ण देशाला माहीत आहे असे का झाले – ‘मैत्री टिकवून ठेवण्यासाठी’. असं ट्वीट करत काँग्रेसने ते फोटो देखील ट्वीटसोबत शेअर केले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे पोस्टर राहुल गांधींनी सभागृहात दाखवले होते. पहिल्या फोटोत मोदी हे अदाणींचं खाजगी विमान वापरत असताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अदाणी आणि मोदी हे एकत्र खाजगी विमानातून प्रवास करत असताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत एक तुलना करण्यात आली आहे. ज्यामध्ये 2014 च्या आधी अदाणींचा व्यवसाय कुठे-कुठे होता आणि 2014 नंतर त्याचा कुठे-कुठे विस्तार झाला हे दाखविण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> Sana Khan: नागपूरमधील भाजप महिला नेता बेपत्ता, हत्या झाल्याचा संशय

दरम्यान, याआधी देखील हेच पोस्टर राहुल गांधी यांनी लोकसभेत दाखवले होते. तेव्हा देखील लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर या गोष्टीवर आक्षेप घेतले होते. त्यावेळी कॅमेरा राहुल गांधींकडे असल्याने नेमके काय पोस्टर आहेत हे सर्वांना पाहायला मिळालं होतं. मात्र, आज (9 ऑगस्ट) कॅमेरा राहुल गांधींकडे नसल्याने फोटो नेमके कोणते आहेत याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती.

पोस्टर दाखवताना राहुल गांधींनी मोदींवर नेमका कसा चढवला होता हल्ला?

‘जर नरेंद्र मोदीजी हे भारताचा आवाज ऐकत नाही.. जर भारताच्या मनातील गोष्ट ऐकत नाही.. तर कोणाचा आवाज ऐकतात? फक्त तर दोन लोकांचा आवाज ऐकतात.. यांचा आवाज ऐकतात.. यासाठी ऐकतात कारण.. पाहा अदानींसाठी मोदींनी काय काम केलंय.. पाहा.. हे पहिले आणि हे नंतर.. (यावेळी राहुल गांधींनी काही पोस्टर दाखवले.. ज्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला. यावेळी संपूर्ण वेळ कॅमेरा हा फक्त ओम बिर्ला यांच्यावरच ठेवण्यात आला होता.)’

‘रावण फक्त दोनच लोकांचं ऐकायचा.. एक मेघनाथ आणि दुसरं कुंभकर्णाचं.. तसंच नरेंद्र मोदी हे दोन लोकांचं ऐकतात.. अमित शाह आणि अदाणी.. लंकेला हनुमानाने नव्हतं जाळलं.. लंकेला रावणाच्या अंहकाराने जाळलं होतं.’

हे ही वाचा >> हॉरर किलिंग! हिंदू मुलासोबत प्रेमसंबंध, भररस्त्यावर वडील अन् भावाने…

‘रामाने रावणाला नव्हतं मारलं… रावणाच्या अंहकाराने रावणाला मारलं होतं. आपण संपूर्ण देशावर रॉकेल फेकत आहात.. तुम्ही मणिपूरवर रॉकेल फेकलं आणि नंतर आग लावली.. आता आपण हरियाणामध्ये तेच करत आहात.. संपूर्ण देश आपल्याला जाळून टाकायला सुरुवात केली आहे. तुम्ही संपूर्ण देशात भारतमातेची हत्या करत आहात..’ असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT