अबू आझमींचं निलंबन नेमकं झालं कशामुळे? तुम्हाला माहितीए त्याची नेमकी Story?

रोहित गोळे

औरंगजेबाचं कौतूक करणं हे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना प्रचंड महागात पडलं आहे. कारण त्यांचं संपूर्ण अधिवेशानासाठी विधानसभेतून निलंबन करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

अबू आझमींचं निलंबन नेमकं झालं कशामुळे?
अबू आझमींचं निलंबन नेमकं झालं कशामुळे?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आमदार अबू आझमींचं का झालं निलंबन?

point

अबू आझमींच्या विधानाचा सर्वपक्षीय आमदारांचा विरोध

point

संपूर्ण अधिवेशनासाठी आझमींचं करण्यात आलं निलंबन

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एका वक्तव्याने खळबळ माजवली आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं. पण नेमकं असं काय घडलं की आझमी यांना ही नामुष्की सहन करावी लागली? 

अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य

सोमवारी (3 मार्च) अबू आझमी यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुघल सम्राट औरंगजेबाचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यांनी म्हटलेलं की, "औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता, तर एक उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारत सोन्याची खाण होती आणि त्याने देशात अनेक मंदिरंही बांधली होती.'

हे ही वाचा>> Abu Azmi Suspended : औरंगजेबाचं कौतुक, आयशा टाकियाचे सासरे निलंबित, कोण आहेत अबू आझमी?

इतकंच नाही तर अबू आझमी यांनी बनारसची एक कथाही सांगितली, "जेव्हा एका पंडिताच्या मुलीशी त्याच्या सरदाराने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा औरंगजेबाने त्याला दोन हत्तींमध्ये बांधून मारलं होतं. नंतर त्या पंडितांनी औरंगजेबासाठी मशीद बांधून भेट दिली होती." 

आझमी यांनी असंही दावा केला की, "औरंगजेबाच्या काळात भारताची जीडीपी 24% होता आणि त्याच्याविरुद्ध चुकीचा इतिहास सांगितला जातो."

विधानसभेत गदारोळ आणि निलंबन

दरम्यान, अबू आझमी यांच्या याच वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आग भडकली. मंगळवारी (4 मार्च) विधानसभेत सत्ताधारी 'महायुती' आघाडी आणि विरोधकांनी आझमींच्या या विधानाचा जोरदार निषेध केला. शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांनी तर आझमींना "देशद्रोही" म्हटलं आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर थेट म्हटलं की, "ज्याने संभाजी महाराजांना क्रूरपणे छळलं, त्याचं कौतुक करणाऱ्याला या सदनात स्थान नाही."

हे ही वाचा>> विधानसभेत कोणीतरी गुटखा खाऊन थुंकलं, अध्यक्ष म्हणाले- मी 'त्या' आमदाराला पाहिलंय, आता..

बुधवारी (5 मार्च) सकाळी विधानसभेची कार्यवाही सुरू होताच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी म्हटलं, "आझमींच्या वक्तव्याने विधानसभेचा अवमान झाला आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाला आहे.'' 

दरम्यान, हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर झाला आणि आझमींना 26 मार्चपर्यंत चालणाऱ्या संपूर्ण बजट सत्रातून निलंबित करण्यात आलं.

अबू आझमींची माफी मागितली अन्...

वाद वाढत असल्याचं पाहून अबू आझमींनी मंगळवारीच माफी मागितली होती. त्यांनी म्हटलेलं की, "मी जे काही बोललो, ते इतिहासकारांच्या आधारावर होतं. पण जर कोणी दुखावलं असेल, तर मी माझं वक्तव्य मागे घेतो." पण ही माफी त्यांचा बचाव करू शकली नाही. 

आझमींच्या समर्थकांचं म्हणणं आहे की, त्यांच्या वक्तव्याची तोडमोड करुन ते दाखवण्यात आलं, तर विरोधकांचं म्हणणं आहे की, औरंगजेबासारख्या आक्रमकाचं उदात्तीकरण करणं हा मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान आहे.

अबू आझमींच्या विधानाने राजकीय वाद 

या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण दिलं. काहींचं म्हणणं आहे की आझमींचं वक्तव्य हा एक "राजकीय डाव" होता, ज्यामुळे इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवता येईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी तर असा दावा केला की, "आझमींकडून हे वक्तव्य मुद्दाम करवून घेतलं गेलं, जेणेकरून धनंजय मुंडे प्रकरणावरून लक्ष हटेल." दरम्यान, आझमींच्या निलंबनानंतर त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एका वक्तव्याने अबू आझमी यांना विधानसभेच्या दारातून बाहेरचा रस्ता दाखवला. औरंगजेबाच्या इतिहासावरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय रंग घेतोय. आता प्रश्न हा आहे की, हे प्रकरण इथेच थांबेल की पुढे आणखी काही नाट्यमय घडामोडी घडतील? तोपर्यंत, अबू आझमींच्या या "औरंगजेब प्रेमाला" महाराष्ट्रातून मात्र सातत्याने विरोध होत राहील.

हे वाचलं का?

    follow whatsapp