Supriya Sule : गुप्तेंसमोर सुप्रिया सुळे का रडल्या, खुप्ते तिथे गुप्ते कार्यक्रमात काय घडलं?
छोट्या पडद्यावरील खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे काही जुने फोटो दाखवण्यात आले होते.
ADVERTISEMENT

Khupte Tithe Gupte Supriya Sule : छोट्या पडद्यावरील खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे काही जुने फोटो दाखवण्यात आले होते. हे फोटो पाहून सुप्रिया ताईंना अश्रू अनावर झाले आहेत. यासोबतच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. (supriya sule cry khupte tithe gupte avdhoot gupte show Sharad pawar ajit pawar)
प्रसिद्ध गायक अवधुक गुप्ते याच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या आगामी भागात सुप्रिया सुळे दिसणार आहेत. या भागाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला अजित दादा- सुप्रिया ताई यांचे काही फोटो दाखवण्यात आले, यासोबतच रक्षाबंधनाचा एक जूना व्हिडिओ देखील दाखवण्यात आला. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ पाहून सुप्रिया सुळे यांना भरून आले आणि रडू देखील कोसळलं.
हे ही वाचा : ‘मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका’, नारायण राणेंचे धक्कादायक विधान
या व्हिडिओनंतर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीतील बंडखोरीवर प्रश्न विचारण्यात आला. यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दात उत्तरे दिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुटलेला नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, तर महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत,असे सु्प्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. तसेच अजित पवार राष्ट्रवादीच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीवर येणाऱ्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार वडील म्हणून कसे आहेत ?
या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी शरद पवार वडील म्हणून कसे आहेत, याचा देखील उलगडा केला. शरद पवार फार मार्गदर्शन करत नाहीत, ते खूप कमी बोलतात. तसेच ज्यावेळेस सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार झाल्या, त्यावेळेस शरद पवारांनी त्यांना काय मार्गदर्शन केले होते, याचा किस्सा देखील त्यांनी यावेळी सांगितला.
लोकसभा निवडणूक जिंकल्यावर शरद पवार म्हणाले की, आज तू गेट नंबर एक मधून खासदार म्हणून चालली आहेस. गेट नंबर 1 च्या पायऱ्या चढण्यासाठी जी संधी मिळाली आहे, ती बारामती लोकसभा मतदार संघातील मतदारांमुळ तुला मिळाली आहे. जोपर्यंत त्या मतदारांना दरवेळेस चढताना लक्षात ठेवशील , तोपर्यंत चढता येईल, ज्या दिवशी त्या मतदारांना विसरशील, तेव्हा पायरी चढता येणार नाही, असा सल्ला दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.