शरद पवारांचं वय झालं, रिटायर्ड व्हायला पाहिजे का? उद्धव ठाकरें म्हणतात…

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

uddhav Thackeray interview : sanjay raut asked questions about sharad pawar retirement.
uddhav Thackeray interview : sanjay raut asked questions about sharad pawar retirement.
social share
google news

Uddhav Thackeray Interview : शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले होते की, रिटायर होणार आहात की नाही? त्यावरून शरद पवार चांगलेच चिडलेले दिसले. माझ्या वयाबद्दल बोलू नका, असा इशारा त्यांनी नंतर दिला. शरद पवारांच्या वयाबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली.

आवाज कुणाचा पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका मांडली. संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा उत्तरार्धही प्रकाशित झाला आहे.

संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न केला की, ‘आपण पाहिलं असेल की, हे सगळे राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यांचे मंत्री… त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शरद पवार यांचे आशीर्वाद घ्यायला परत त्यांच्या दारात गेले…’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘माझ्याकडे येण्याची कोणाची हिंमत झाली नाही.’

संजय राऊत त्यालाच जोडून म्हणतात, ‘बरोबर आहे. त्यासाठी मी आपल्याला हा प्रश्न विचारतोय…’

नंतर या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘तेच सांगतोय. तुम्ही जे मघाशी म्हणालात की, मी बाळासाहेबांचे विचार सोडले, हे सोडलं ते सोडलं. असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं ढोंग होतं. ते म्हणतात राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो, आता राष्ट्रवादीच्याच हातात म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेलेल्या आहेत. त्यापूर्वी 2014 ते 2019 मध्ये जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही आता ज्यांच्याविषयी बोलताय याच महाशयांनी भाजपबरोबर कसं बसायचं? म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळेचे जे तथाकथित मंत्री होते जे आता गेलेत.’

ADVERTISEMENT

वाचा >> Pune Crime News : महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार! सावकाराचं भयंकर कृत्य

‘मी न सांगता ते बडेजाव मारत होते की आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो. कोणी सांगितलं होतं तुम्हाला खिशात राजीनामे घेऊन फिरायला? का वेळ आली होती तुमच्यावर? आणि ही सगळी तुमचीच वक्तव्यं आहेत की, आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो आणि भाजप ज्या पद्धतीने शिवसैनिकांवर, कार्यकर्त्यांवर अत्याचार करतोय, अन्याय करतोय. म्हणून मी त्यांच्यासोबत बसू शकत नाही. म्हणून कल्याणला की डोंबिवलीला जाहीर सभेत राजीनामा देणारे हेच महाशय होते. मग तेव्हा तुम्ही काय सोडलं होतंत आणि मी तरी काय सोडलं होतं? या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतःला इकडे सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत आणि त्याचा मला उबग आला आहे. आणि म्हणून मी आणखी काहीतरी मिळवायला जातोय असं कोणीच बोलत नाहीये. मला आता सुखाचा वीट आलाय, सगळं मिळालंय, आणखी काय देणार. म्हणून याच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी मिळवतोय असं बोलून जा ना… आणि हेच सत्य आहे.’

ADVERTISEMENT

बंडखोर आमदार पुन्हा परत आले तर…

खासदार राऊतांनी आणखी एक प्रश्न ठाकरेंना केला. ते म्हणाले, ‘जसे फुटीर पवारांच्या दारात गेले… नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट दिले. पवारांचे फोटो लावून मतं मागताहेत किंवा चर्चा घडवताहेत. अशा प्रकारे शिवसेनेतले फुटीर जर तुमच्या दारात आले…’

या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘त्यांची हिंमतच नाही येण्याची. आले तर वगैरेचा विषयच नाही… येऊच शकत नाहीत ते… त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव माहितेय आणि शिवसेनेची विचारधारा म्हणजेच बाळासाहेबांची विचारधारा काय आहे, हे त्यांना माहिती आहे.’

शरद पवारांनी रिटायर्ड व्हायला हवे का?

‘शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम तरुणांचं नेतृत्व केलं, ते तरुणांचेच नेते राहिले. पण आता अजित पवारांनी त्यांच्या काकांसंदर्भात किंवा पक्षाच्या प्रमुखांसंदर्भात एक जे वक्तव्य केलं की शरद पवारांनी आता रिटायर्ड व्हायला पाहिजे. त्यांचं वय झालंय. यावर आपलं काय मत आहे’, असा प्रश्न संजय राऊत यांनी केला.

वाचा >> MNS Toll: ‘टोलचा सगळा पैसा घेणारा म्हैसकर कोणाचा लाडका…’, राज ठाकरे प्रचंड संतापले

त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘अत्यंत वाईट असं हे मत होतं. कारण शेवटी ज्यांच्याकडून आपण सर्वकाही घेतो त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणं हे आपल्या संस्कृतीला शोभा देणारं नाही. नेहमी आपण वडीलधाऱ्यांचा मान, आदर, सन्मान ठेवतो. आणि तो ठेवलाच पाहिजे. वय झालं म्हणजे काय? मग आशीर्वाद कोणाकडून घ्यायचे? हे त्यांचं वक्तव्य मला आवडलं नाही. तुमचं पटत नसेल तर जाहीर सांगा की तुमचं का पटत नाही. या वयातसुद्धा ज्यांनी तुम्हाला सगळं काही दिलं त्यांना तुम्ही आता या पद्धतीने बोलणार हे मला पटलेलं नाही. केवळ अजित पवारच नाही, तर ज्याला कोणाला त्याच्या स्वार्थासाठी जायचं असेल तर स्वार्थासाठी जातोय हे खरं बोलून जावं, कदाचित लोकं स्वीकारतील. पण चार-चार, पाच-पाच वेळा सगळं मिळाल्यानंतर, सगळं जे चांगल्यात चांगलं देता येणं शक्य होतं ते दिल्यानंतरसुद्धा अन्याय झाला हो… म्हणून टाहो फोडून जाणं हे बरोबर नाही. मग त्यात आमच्यातलेसुद्धा गद्दार असतील आणि सगळ्याच पक्षातले गद्दार असतील’, असं उत्तर ठाकरेंनी या प्रश्नावर दिलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT