Ajit Pawar : “…म्हणून आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो”
अजित पवारांनी पक्षाच्या आमदारांसोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
ADVERTISEMENT
Ajit Pawar Press conference : अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत जाणार आहेत, ही बातमी 2 जुलै 2023 रोजी खरी ठरली. अजित पवारांनी पक्षाच्या आमदारांसोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्यामागचं कारण स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होण्याचा निर्णय घेतला. मी आणि इतर सहकाऱ्यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी शपथ दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यात इतरांना संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासंदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. सध्या देशात आणि राज्यातील परिस्थितीचा विचार करून विकासाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि सहकाऱ्यांचं मत झालं. मोदींच्या नेतृत्वाखाली जो कारभार चालला आहे. ते बघितलं तर मोदी मजबुतीने देशाला पुढे नेण्याचं काम करत आहे.”
“विरोधकांच्या बैठकांमध्ये काहीही हाती लागत नाहीये”
“त्याला पाठिंबा दिला पाहिजे, असं आमचं मत झालं. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे सरकार आहे. विरोधकांची बैठकी होते, पण त्यातून काहीही हाती लागत नाही. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला. इतके दिवस मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला”, असं अजित पवार म्हणाले.
हे वाचलं का?
वाचा >> अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“पक्षाच्या वर्धापन दिनी माझी भूमिका मांडली होती. भुजबळ यांनी पक्षाची स्थापना झाल्यापासून काम केलं. इतरांनीही काम केलं. इथून पुढे तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या सरकारमध्ये आम्ही विकासाचा मुद्दा समोर ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला”, असंही पवारांनी सांगितलं.
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच – अजित पवार
“आम्हाला टीकेला उत्तर देण्याचं गरज नाही. महाराष्ट्राचा विकास करणं, निधी कसा मिळेल, सर्व घटकांना मदत करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व आमदारांना मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या सरकारमध्ये सहभागी झालो असून, इथून पुढच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हाखालीच लढवणार आहोत. पक्ष मजबूत करण्यासाठी काम करणार आहोत”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
ADVERTISEMENT
वाचा >> ‘मी साधुसंत नाही, तर…’, ठाकरेंचा उल्लेख, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
“नागालँडमध्ये सात आमदार निवडून आले. तिथे आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काही जण वेगवेगळे आरोप करतील. वास्तविक साडेतीन वर्षापूर्वी जो निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये काम केलं. त्यामुळे जातीयवादी म्हणण्यात अर्थ नाही, शिवसेनेसोबत आम्ही जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो”, असं म्हणत अजित पवारांनी पुरोगामी अजेंड्यावरून टीका करण्याचे कारण राहिलेलं नाही, हे स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT