Ind vs Aus :टीम इंडियाचा शेवट कडू; ऑस्ट्रेलियाने 2-1 ने मालिका घातली खिशात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ind vs Aus 3rd odi : टीम इंडियाविरूद्धचा (Team India) तिसरा वनडे सामना ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी जिंकला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने (Australia) तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार अॅडम झम्पा (adam zampa) ठरला आहे, त्याने या सामन्यात चार विकेट घेतल्या आहेत.(ind vs aus 3rd odi australia won by 21 runs and series won 2-1 adam zampa)

ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाने (Australia) दिलेल्या 269 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची (Team India) सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा आणि शुबमन गिलने आक्रमक सुरुवात केली होती.मात्र मोठ्या धावा करण्यात दोघेही अपयशी ठरले होते. रोहित शर्मा 30 धावा करून बाद झाला.त्यापाठोपाठ शुबमन गिल 37 धावावर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.मात्र तो देखील 54 धावांची अर्धशतकीय खेळी करून बाद झाला.

गिलनंतर एकामागून एक विकेट पडण्याचा सिलसिला सुरूच होता. राहूल 32, अक्षर पटेल 2, हार्दीक पड्या 40, सुर्यकुमार यादव पुन्हा गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर रविंद्र जडेजा 18, कुलदीप यादव 6, शमी 14 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे टीम इंडियाचा डाव 248 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने सर्वाधिक 4, तर अॅश्टन अगरने 2 आणि स्टॉईनिश आणि अबॉटने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे वाचलं का?

Viral Video : कुलदीप यादवची कमाल!ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला चकवा देत क्लिन बोल्ड

प्रथम फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा (Australia) सलामीवीर ट्रेविस हेड आणि मिचेश मार्शने चांगली सुरुवात केली होती. मात्र या दोन्ही खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नाही. मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावा केल्या. ट्रेविस हेडने 33 तर अॅलेक्स कॅरीने 38 धावा केल्या आहेत. तर इतर खेळाडू 30 धावांच्या आत आऊट झाले होते. टीम इंडियाने 269 धावात ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केले आहेत.त्यामुळे टीम इंडियासमोर 270 धावांचे लक्ष्य होते. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि हार्दीक पंड्याने प्रत्येकी 3 तर सिराज आणि पटेलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत.

ADVERTISEMENT

Shreyas Iyer : टीम इंडियाला झटका! IPL, WTC मधून श्रेयस राहणार बाहेर, कारण…

ADVERTISEMENT

दरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1ने खिशात घातली.ऑस्ट्रेलियाचा विजयाचा शिल्पकार अॅडम झम्पा ठरला आहे.

World Cup 2023 Schedule: अहमदाबाद अंतिम सामन्याचा थरार! पाकिस्तान खेळणार का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT