Paris Olympic 2024 : मनू भाकरने रचला इतिहास, नेमबाजीत भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

मुंबई तक

ADVERTISEMENT

manu bhaker won bronze medal in women 10 meter air pistol shooting paris olympic 2024
भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे.

point

महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले

point

भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज

Manu Bhaker Won Bronze Medal: भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. मनूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. त्यामुळे भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे. मनू भाकरने कांस्यपदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला खातं उघडून दिले आहे. (manu bhaker won bronze medal in women 10 meter air pistol shooting paris olympic 2024)

ADVERTISEMENT

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या अंतिम फेरीत एकूण 221.7 गुण मिळवत कांस्य पदक पटकावले आहे. तर कोरियन खेळाडू ओ ये जिनने 243.2 गुणांसह सुवर्णपदक पटकावले आहे. तर किम येजीने 241.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले आहे. 

हे ही वाचा : Mahendra Thorve : "राष्ट्रवादीकडून पाठीत वार करण्याचे काम सुरू", महायुतीत संघर्ष

मनू भाकरचा फायनल स्कोर 

पहिले 5 शॉट सीरीज : 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4
दूसरे 5 शॉट सीरीज: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण 49.9
इतर शॉट : 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3

हे वाचलं का?

मनू भाकर 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत एकूण 580 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. भाकरने पहिल्या मालिकेत 97, दुसऱ्यामध्ये 97, तिसऱ्यामध्ये 98, चौथ्यामध्ये 96, पाचव्यामध्ये 96 आणि सहाव्या मालिकेत 96 गुण मिळवले. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रिदम सांगवानही सहभागी होत होती, पण तिने निराशा केली. रिदम 573 गुणांसह 15व्या स्थानावर आहे.

भारतीय नेमबाज मनू भाकर पॅरिस 2024 मध्ये होणाऱ्या तिच्या दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहे. तिने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदार्पण केले होते. परंतु 10 मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीत तिची पिस्तूल खराब झाल्यामुळे तिला पदकापासून वंचित रहावे लागले. मिश्र सांघिक 10 मीटर पिस्तूल आणि 25 मीटर पिस्तूल प्रकारातही तिचे पदकं हुकली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Guru Waghamare : मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली नावं, पण गर्लफ्रेंडनेच काढला काटा, Inside Story

22 वर्षीय मनू भाकर पॅरिस 2024 ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल, 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक आणि महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेत आहे. 21 सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव ॲथलीट आहे जी अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT