Paris Olympic 2024 : मनू भाकर-सरबजोत जोडीचा 'कांस्य' वेध! भारताच्या खात्यात दुसरं पदक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनू- सरबजोतची ऐतिहासिक कामगिरी

point

मनू भाकरचा मोठा विक्रम 

point

PM मोदींकडून मनू भाकर-सरबजोत सिंग यांचे कौतुक

Manu Bhaker-Sarabjot Singh Bronze Medal : मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांच्या जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. त्यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र गट स्पर्धेत ओ ये जिन आणि ली वोंहो या मिश्र कोरियाच्या जोडीला पराभूत करून भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. आता एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली असल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. (paris olympics 2024 manu bhaker sarabjot singh won bronze medal in 10m air pistol mixed team manu created history she is first indian to win two medals in the same olympics in air pistol )

ADVERTISEMENT

मनू- सरबजोतची ऐतिहासिक कामगिरी

मनू भाकरने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र गटात सरबजोत सिंगसह कोरियाचा पराभव करून इतिहास रचला. या जोडीने ऑलिम्पिकमध्ये कोरियाचा 16-10 असा पराभव करत भारताच्या खात्यात दुसरे पदक आणले आहे. यापूर्वी मनूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वैयक्तिक कांस्यपदक जिंकले आहे.

हेही वाचा : Yashashree Shinde : दाऊद शेखने यशश्रीची का केली हत्या? पोलिसांकडून मोठा खुलासा

वैयक्तिक कांस्यपदक जिंकल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या चौथ्या दिवशीही चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा मनू भाकरवर खिळल्या होत्या. तिने तिचे कर्तृत्व आज (30 जुलै) पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. मनू आणि सरबजोत सिंगच्या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र गटात दुसरे कांस्यपदक मिळवले. त्यामुळे आता त्यांचे खूप कौतुक होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मनू भाकरचा मोठा विक्रम 

मनू भाकरने 30 जुलैला कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकता आलेली नाहीत. सुशील कुमार आणि पीव्ही सिंधू यांनी निश्चितच प्रत्येकी दोन पदके जिंकली आहेत, परंतु ही पदके वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये जिंकून आणलेली आहेत.

हेही वाचा : Govt Job : NABARD मध्ये भरघोस पगाराची नोकरी; कोणाला करता येणार अर्ज?

मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले आणि हे पदक जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. मनूने अंतिम फेरीत एकूण 221.7 गुण मिळवले होते, सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरे पदक आहे. तसेच, ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीतील भारताचे हे सहावे पदक ठरले.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Supriya Sule : "अजित पवार अमित शाहांना चोरून भेटायला का येत होते?", सुप्रिया सुळेंनी पकडले कात्रीत

PM मोदींकडून मनू-सरबजोत यांचे भरभरून कौतुक

पीएम मोदींनी मनू भाकर आणि सरबजोत यांचे अभिनंदन केले. त्यांनी X वर लिहिले, 'आमचे नेमबाज सतत आमचा अभिमान वाढवत आहेत. ऑलिम्पिकमधील 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र गट स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांचे अभिनंदन. दोघांनी उत्तम कौशल्य आणि टीमवर्क दाखवले आहे. भारत खूपच आनंदी आहे. मनूसाठी, हे तिचे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक आहे, जे तिची निरंतर उत्कृष्टता आणि समर्पण दर्शवते.'

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT