Dombivali School: महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहत आहे. कधी विद्यार्थ्यांमुळे तर शिक्षकांमुळे. सध्या डोंबिवलीतील शाळा आणि त्या शाळेतील एका शिक्षिकेमुळे शिक्षणक्षेत्र हादरुन गेले आहे. कारण डोंबिवलीच्या शाळेत गणिताच्या शिक्षिकीने शाळेतील 80 विद्यार्थ्यांना प्रचंड मारहाण करत त्यांना शिक्षा केली आहे. शिक्षिकेने मुलांना केलेल्या मारहाणीमुळे त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. डोंबिवलीमधील एस. एच. जोंधळे विद्या मंदिर इंग्लिश मीडिय स्कुलमध्ये गणित शिकवणाऱ्या शिक्षिकेबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती.
ADVERTISEMENT
विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर संतापलेल्या शिक्षिकेने 80 मुलांना बेदम मारहाण करत त्यांना शिक्षा दिली आहे. विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा >>कैद्यांना तुरुंगातच पार्टनरसोबत करता येणार रोमान्स? सरकारने कोर्टात काय दिली माहिती?
शिकवताना त्रास
डोंबिवलीमधील जोंधळे विद्यामंदिरात काही दिवसांपूर्वी नीलम भारमल रुजू झाल्या होत्या. त्या रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडे पाचवी व सहावीच्या विज्यार्थ्यांचा गणित विषय देण्यात आला होता. मात्र काही दिवसात विद्यार्थ्यांनी मॅडम गणित व्यवस्थित शिकवत नाहीत. त्याचबरोबर त्या शिकवताना विद्यार्थ्यांना खूप त्रास देतात अशी तक्रार केली होती.
पालकांचा संताप
विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. पालकांची तक्रार येताच मुख्याध्यापकांनीही त्यानंतर शिक्षिकेला समज दिली. मुख्यध्यापकांनी भारमल यांना समज देताच त्यांनी संतापून शाळेतील 80 मुलांना प्रचंड मारहाण केली.
मानेला दुखापत
शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षिकेने एवढी जोरदार मारहाण केली होती, मुलांच्या हाताला आणि मानेला दुखापत झाली. तर काही विद्यार्थ्यांना त्यांनी लोखंडी गजानेही मारहाण केली आहे. शाळेतील मुलांनी आपल्याला मारहाण झाल्याचे सांगताच पालकांनी शाळेत येऊन गोंधळ घातला. त्यांच्यावर ताबोडतोब कारवाई करण्याची मागणीही पालकांनी केली.
हे ही वाचा >> प्रेमाच्या त्रिकोणात रक्ताचा सडा! चाकूने भोसकून मित्राच्या शरीराची केली चाळण
शिक्षिकेवर कडक कारवाई
विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत येऊन जोरदार गोंधळ घातल्यानंतर मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल अधिनियम कलम 24 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिक्षिकेवर कडक कारवाई होणार असल्याचे बोलले जात असून शाळेतूनही त्यांना काढून टाकण्यात आले आहे.
ADVERTISEMENT