Badlapur News: आंदोलनकर्त्यांना बेदम मारहाण अन् बरंच काही...; पोलिसांनी संतप्त जमावावर केला लाठीचार्ज

मुंबई तक

20 Aug 2024 (अपडेटेड: 20 Aug 2024, 06:54 PM)

Police Action Againts Protestors : बदलापूरच्या आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घटनेमुळं प्रशासनाची झोप उडाली आहे. पीडित मुलींना न्याय देण्याच्या मागणीसाठी संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन केलं.

Badlapur News Update

Badlapur News Update

follow google news

बातम्या हायलाइट

point

आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केला लाठचार्ज

point

संतप्त नागरिकांवर लाठ्या काठ्या मारून पोलिसांनी रेल्वे ट्रॅक खाली केला

point

आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली होती

Police Action Againts Protestors : बदलापूरच्या आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घटनेमुळं प्रशासनाची झोप उडाली आहे. पीडित मुलींना न्याय देण्याच्या मागणीसाठी संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन केलं. सकाळी ९ वाजल्यापासून बदलापूरच्या नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर रेलरोको करत संतापलेल्या नागरिकांना प्रशासनाला धारेवर धरलं. लोकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळं जवळपास ९ तास रेल्वेसेवा ठप्प झाली होती. मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची वाहतूक थांबवल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. (The incident of sexual abuse of two minor girls in Adarsh ​​Vidyalaya of Badlapur has left the administration sleepless. Angry parents staged a sit-in protest at Badlapur railway station to demand justice for the victim girls)

हे वाचलं का?

मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरुच ठेवलं. त्यामुळे पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना लाठ्या काठ्या मारून बेदम मारहाण करत रेल्वे ट्रॅक खाली केला. आंदोलनकर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला वेढा घालून प्रशासनाला धारेवर धरलं होतं. तसच पोलिसांवरही नागरिकांनी दगडफेक केली होती. त्यामुळे हे आंदोलन चिघळल्याची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आहे.

हे ही वाचा >> Badlapur Crime: मंत्री गिरीश महाजन बदलापूर स्टेशनवर आले अन्... वाचा जे घडलं ते!

मंत्री गिरीश महाजनांनी आंदोलनकर्त्यांना केलं आश्वस्त

"या घटनेबाबत काही दिवसांतच तपास पूर्ण होईल. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल. या प्रकरणी एसआयटी नेमली गेली आहे. हे प्रकरण सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे असणार आहे. या आंदोलनात कुणाचंही नेतृत्व नाही. कुणीही कुणाचं ऐकत नाही. तरुणांना राग येणे योग्य आहे. पण त्यामुळे रेल्वेसेवा बंद ठेवायची हा त्यामागचा उपाय नाही.

आम्ही त्यांना विनंती करत सांगितलं की प्रशासनाने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे. पोलीस अधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबीत केलं आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये टाकलं आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणासाठी नियुक्ती करत आहोत. ही केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये चालवून जो आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर शिक्षा देणार आहोत", असं गिरीश महाजन म्हणाले. 

    follow whatsapp