Crime News :
ADVERTISEMENT
केरळमधील कोझिकोडमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लावून 3 जणांची निघृण हत्या करणाऱ्या माथेफिरुला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमधून एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, अटकेची कारवाई होताच केरळ पोलिसांच्या एका पथकाने रत्नागिरीत येऊन आरोपीचा ताबा घेतला. (The man who set a train coach on fire in Kerala’s Kozhikode and killed 3 people has been arrested from Maharashtra.)
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपमहानिरीक्षक महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख सैफी असे आरोपीचे नाव असून तो दिल्लीतील शाहिनबाग परिसरातील रहिवासी आहे. गुप्त माहितीच्या आधारे हा माथेफिरु रत्नागिती जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रुग्णालयात जाऊन पाहिलं असता तो तिथून फरार झाला होता. त्यावेळी या व्यक्तीला पोलिसांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरुन अटक केली, अशी माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा : पुण्यात गँगवार भडकणार? गजा मारणे प्रकरणात पोलिसांचा ‘तो’ रिपोर्ट का चर्चेत?
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या घटनेवर निवेदन दिले आहे. या अक्षम्य गुन्ह्यातील गुन्हेगाराला इतक्या लवकर पकडल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकार, पोलीस आणि आरपीएफ-एनआयएचे आभार मानतो, असं ते म्हणाले. तर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हंटलं.
काय घडलं होतं?
केरळमधील कोझिकोडमध्ये अलाप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये रविवार (2 एप्रिल) रात्री 9.45 वाजता एका प्रवाशाने सहप्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर 9 जण जखमी झाले होते. बोगीला अचानक आग लागल्याचे पाहून एका वर्षाच्या चिमुकल्यासह प्रवास करणाऱ्या एका महिलेने चालत्या ट्रेनमधूनच उडी मारली होता. या दोघांशिवाय पोलिसांना रुळांवरून आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.
हेही वाचा : दोन नवऱ्यांसोबत खुश… तरीही महिलेला करायचंय तिसरं लग्न, कारण ऐकून बसेल धक्का!
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून रेल्वेच्या बोगीला आग लावणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना या प्रकरणात काही धागेदोरे हाती लागले होते. तसंच पोलिसांनी या आरोपचं स्केचही तयार केलं होतं. आता महाराष्ट्रातील रत्नागिरीतून या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने गुन्हा कबूल केला असल्याचही उपमहानिरीक्षक महेश पाटील यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT