Phalodi Satta Bazar Lok Sabha Election 2024 : देशात उद्या 1 जूनला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. हे मतदान संपताच संध्याकाळी लगेचच एक्झिट पोलचे (Exit Poll 2024) आकडे समोर येणार आहेत. तत्पुर्वी राजस्थानचा प्रसिद्ध फलोदी सट्टा बाजाराने (Phalodi Satta Bazar) देशातील लोकसभा निवडणुकीबाबतचा (Lok Sabha Election 2024) अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार येणार आहे. पण भाजपप्रणित एनडीए 400 पारचा आकडा पार करणार का? हे जाणून घेऊयात. (phalodi satta bazar prediction on lok sabha election 2024 india allince bjp nda pm narendra modi rahul gandhi)
ADVERTISEMENT
निवडणुका असो, क्रिकेटचे सामने असोत किंवा हवामान असो...राजस्थानचा प्रसिद्ध फलोदी सट्टा बाजार या सर्वांवर अचूक अंदाज बांधण्याचा आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकी संदर्भात सट्टेबाजीच्या बाजाराचा नवीनतम अंदाज काय आहे? तो जाणून घेऊयात.
हे ही वाचा : "निकालानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार कुठे आहेत, हे शोधावं लागेल"
यंदाच्या लोकसभा निडवणुकीत भाजपप्रणित एनडीएने 400 पारचा नारा दिला आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्नात आहे. यावरच आता फलोदी सट्टा बाजाराने अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप तिसऱ्यांदा सत्तते येण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीत भाजपला 290-300 जागा मिळतील असे सटटा बाजार सांगतेय. तर काँग्रेसला 40 ते 42 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीत 52 जागा जिंकल्या होत्या.त्यामुळे त्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला यंदा कमी जागा येण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशमध्ये किती जागा येणार?
लोकसभेच्या जागांच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण या राज्यातील निकाल केंद्रात कोणाची सत्ता येते हे ठरवते.सट्टेबाजीच्या बाजारानुसार, उत्तर प्रदेशमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असूनही, भाजपला अजूनही 62 ते 65 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
देशभरातील विविध सट्टाबाजाराचा अंदाज
सट्टाबाजाराचा अंदाज | काँग्रेस | इंडिया आघाडी | भाजप | एनडीए |
पालनपुर सट्टा बाजार | 112 | 225 | 216 | 247 |
करनाल सट्टा बाजार | 108 | 231 | 235 | 263 |
बोहरी सट्टा बाजार | 115 | 212 | 227 | 255 |
बेलगाम सट्टा बाजार | 120 | 230 | 223 | 265 |
कोलकत्ता सट्टा बाजार | 128 | 228 | 218 | 261 |
विजयवाडा सट्टा बाजार | 121 | 237 | 224 | 251 |
इंदूर सराफा बाजार | 94 | 180 | 260 | 283 |
अहमदाबाद चोखा बाजार | 104 | 193 | 241 | 270 |
सूरत मघोबी बाजार | 96 | 186 | 247 | 282 |
देशातील विविध सट्टा बाजाराने अंदाज व्यक्त केलेले हे आकडे आहेत. आता हे आकडे किती ठरतात? नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का? हे आता निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT