गँगस्टरच्या धमकीनंतर सलमानची सुरक्षा वाढवली, गॅलॅक्सी बाहेर पोलिसांचा पहारा

मुंबई तक

• 12:42 AM • 20 Mar 2023

Salman khan Security: बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खानला गँगस्टर गोल्डी ब्रारने (Goldy Brar) धमकी दिली आहे. त्यानंतर त्यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रात्रभर मुंबईतील जवान गॅलेक्सी, सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर गस्त घालताना दिसले. पोलिसांची संपूर्ण कारवाई सुरू आहे. ते गॅलेक्सीच्या बाहेर गर्दी जमू देत नाहीत. (Police guard the galaxy; Salman’s security beefed […]

Mumbaitak
follow google news

Salman khan Security: बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खानला गँगस्टर गोल्डी ब्रारने (Goldy Brar) धमकी दिली आहे. त्यानंतर त्यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रात्रभर मुंबईतील जवान गॅलेक्सी, सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर गस्त घालताना दिसले. पोलिसांची संपूर्ण कारवाई सुरू आहे. ते गॅलेक्सीच्या बाहेर गर्दी जमू देत नाहीत. (Police guard the galaxy; Salman’s security beefed up after gangster threat)

हे वाचलं का?

सलमान खानला धमकी

18 मार्च रोजी सलमानचे मॅनेजर प्रशांत गुंजाळकर यांना धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये सलमानशी बोलायचं आहे, असं लिहलंय. रोहित नावाने हा मेल आला आहे. ई-मेलमध्ये लिहिले होते, ‘गोल्डी ब्रारला तुमच्या बॉसशी म्हणजेच सलमान खानशी बोलायचे आहे. त्याने मुलाखत पाहिली असेल, नसेल तर बघायला सांगा. जर तुम्हाला प्रकरण बंद करायचं असेल तर बोलणं करून द्या. समोरासमोर करायचं असेल तर तेही सांग. मी तुम्हाला वेळेत कळवले आहे, पुढच्या वेळी तुम्हाला झटका पाहायला मिळेल…’अशी धमकी देण्यात आली आहे.

ई-मेल मिळाल्यानंतर सलमान खानच्या व्यवस्थापकाने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य आणि सलमान खानची सुरक्षा लक्षात घेऊन वांद्रे पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित ब्रार या गुंडांविरुद्ध कलम ५०६(२), १२० (बी), ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला सलमानची माफी हवी आहे. सलमानला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेत्याला तुरुंगातून धमकी दिली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्सने 1998 सालच्या काळवीट प्रकरणी सलमानला माफी मागायला सांगितली होती. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली. सलमानने आपल्या समाजाची माफी मागावी, अशी बिश्नोईची मागणी आहे. गुंड म्हणाला, काळ्या हरणाच्या प्रकरणावरून मी लहानपणापासूनच सलमानवर रागावलो आहे. त्याने माझ्या समाजातील सदस्यांनाही पैसे देऊ केले.

सलमानला मारण्यासाठी रेकी करण्यात आली होती

सलमानवर हल्ला करण्याचे मनसुबे अनेकदा फसले आहेत. 2019 मध्ये, लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या जवळच्या संपत नेहराने सलमान खानच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटची रेखी केली. मात्र सलमानवर हल्ला करण्याचा त्यांचा डाव फसला. मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रांची रेंज कमी असल्याने गुंडाने सलमानवरील हल्ला पुढे ढकलला होता. योजना अयशस्वी झाल्यानंतरही गुंडाने प्रयत्न सोडले नाहीत. गोल्डी ब्रारच्या सांगण्यावरून नेमबाजांना मुंबईत पाठवण्यात आले. त्यांनी सलमानच्या फार्म हाऊसची पूर्ण तपासणी केली. शूटरने फार्म हाऊसच्या गार्डशीही मैत्री केली. अभिनेत्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. मात्र सलमानच्या कडक सुरक्षेनंतर हा प्लानही फसला.

    follow whatsapp