इरफानचा फिल्मफेअर अवॉर्ड स्विकारताना बाबिल झाला भावूक

मुंबई तक

• 01:34 PM • 09 Apr 2021

गेल्या वर्षी बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खानचं निधन झालं होतं. अजूनही फॅन्सच्या मनातून त्याच्या आठवणी जात नाहीत. अशातच इरफान खानला एक ट्रिब्यूट म्हणून फिल्मफेअरच्या विशेष अवॉर्डने गौरवण्यात आलं. इरफानचा मुलगा बाबिल याने हा अवॉर्ड स्विकारला. दरम्यान वडिलांच्या वतीने हा अवॉर्ड स्विकारताना बाबिलला अश्रू अनावर झाले. दरम्यान बाबिलचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या […]

Mumbaitak
follow google news

गेल्या वर्षी बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खानचं निधन झालं होतं. अजूनही फॅन्सच्या मनातून त्याच्या आठवणी जात नाहीत. अशातच इरफान खानला एक ट्रिब्यूट म्हणून फिल्मफेअरच्या विशेष अवॉर्डने गौरवण्यात आलं. इरफानचा मुलगा बाबिल याने हा अवॉर्ड स्विकारला.

हे वाचलं का?

दरम्यान वडिलांच्या वतीने हा अवॉर्ड स्विकारताना बाबिलला अश्रू अनावर झाले. दरम्यान बाबिलचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीयोमध्ये बाबिल खूप भावूक झालेला दिसतोय. तो आपल्या वडिलांना खूप मिस करतोय. अवॉर्ड स्टेजवर जेव्हा ते पोहोचलो त्यावेळी अभिनेता राजकुमार राव, आयुष्मान खुराना इरफान करता जे शब्द वापरतात ते ऐकून भावूक झाला.

इरफान खानचा मुलगा बाबिल नेहमीच सोशल मीडियावर वडील इरफानचे फोटो आणि आठवणी शेअर करत असतो. जवळजवळ दररोज, तो इरफान खानची आठवण करण्यासाठी एखादी पोस्ट शेअर करतो आणि त्याला कॅप्शनही देत असतो. नुकतंच बाबिलने इरफान खानच्या डायरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

गेल्या वर्षी 29 एप्रिल रोजी इरफानचं निधन झालं. त्यावेळी इरफान बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. शिवाय त्याच्यावर उपचारही चालू होते. इरफानने पान सिंग तोमर तसंच पीकू सारखे हीट सिनेमे दिले होते.

    follow whatsapp