ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा लग्नसोहळा मुंबईत पार पडतो आहे.
या लग्नसोहळ्यासाठी मुंबईत कपूर कुटुंबाचे पाहुणे-रावळे दाखल झाले असून सध्या कपूरांच्या घरात लगीनघाई सुरु आहे.
रणबीरची आई आणि आलियाच्या होणाऱ्या सासुबाई ज्येष्ठ अभिनेत्री नितू सिंग आपल्या मुलीसोबत लग्नस्थळी दाखल होताना…
रणबीर आणि आलियाच्या लग्नसोहळ्याची गेल्या अनेक दिवसांपासून मीडियात चर्चा सुरु होती.
13 आणि 14 एप्रिल अशा दोन दिवसांमध्ये हा लग्नसोहळा चालणार असून आजच्या दिवळी गणेशपुजन, मेहंदी आणि हळद होणार असून 14 तारखेला रणबीर-आलिया विवाहबंधनात अडकणार असल्याचं कळतंय.
हॉटेलबाहेर येणाऱ्या पाहुण्यांची छबी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पत्रकारांनी यावेळी गर्दी केलेली पहायला मिळाली.
रणबीरच्या बहिणी करीना आणि करिष्मा आपल्या भावाच्या लग्नासाठी तयार होताना…
या लग्नसोहळ्यासाठी निघताना करिनाचा वावर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कपूर घराण्यात हे पहिलंचं मंगलकार्य आहे, ज्यामुळे सध्या मुंबईत कपूर घराण्यात लगीनघाई पहायला मिळते आहे.
करिना कपूर हॉटेलमध्ये दाखल होताना…
पुजा भट आणि महेश भट लग्नस्थळी दाखल होत असताना…
निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर लग्नस्थळी दाखल होताना…
ADVERTISEMENT