Sita The Incarnation : Kangana Ranaut कडून नव्या चित्रपटाची घोषणा

मुंबई तक

• 11:49 AM • 14 Sep 2021

अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. The Incarnation Sita असं या चित्रपटाचं नाव असून कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. कंगनाने नुकतंच तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेल्या थलायवी या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात कंगनाचा मेकअप आणि तिच्या अभिनयाचं कौतुक होत असतानाच कंगनाने आपल्या […]

Mumbaitak
follow google news

अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. The Incarnation Sita असं या चित्रपटाचं नाव असून कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

हे वाचलं का?

कंगनाने नुकतंच तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेल्या थलायवी या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात कंगनाचा मेकअप आणि तिच्या अभिनयाचं कौतुक होत असतानाच कंगनाने आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

अलौकिक देसाई या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. प्रभू राम आणि मा सिता यांच्या आशिर्वादाने उत्तम कलाकारांसोबत या चित्रपटात काम करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते असं कंगनाने म्हटलं आहे.

हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड या चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनासोबत या चित्रपटात काम करण्यासाठी मी उत्सुक असल्याचं दिग्दर्शक अलौकिक देसाई यांनी म्हटलंय. सीता या चित्रपटाव्यतिरीक्त कंगना धाकड आणि तेजस या दोन सिनेमांत काम करताना दिसणार आहे.

कंगनाचा Saree look, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

    follow whatsapp