ADVERTISEMENT
सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी
प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोसेशनवर तिचे चाहते सोशल मीडियावर भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.
प्राजक्ताने नुकतच साडीवर एक फोटोसेशन केलं आहे.
भरजरी साडी, कपाळावर चंद्रकोर, दागिने आणि अंबाड्यात गजरा असा प्राजक्ताचा अस्सल मराठमोळा अंदाज खुलून दिसत आहे.
पारंपरिक असो किंवा मग वेस्टर्न प्रत्येक पेहरावात प्राजक्ता खुलून दिसते.
भरजरी साडीतल्या या अदांवर प्राजक्ताचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
गेले दोन-तीन महिने प्राजक्ता चांगलीच बिझी होती. पांडू, पावनखिंड आणि लकडाऊन असे प्राजक्ताचे तीन सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले.
याव्यतिरीक्त प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात अँकरिंग करते.
सोशल मीडियावर प्राजक्ताच्या अँकरिंग स्टाईलचे खास मिम्सही तयार होतात.
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा पारंपरिक अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT