बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिने 2018 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर त्यानंतर सर्वांचं लक्ष सैफ अली खान आणि अम्रृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानकडे होतं. तर आता लवकरच इब्राहीम देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण कऱण्यासाठी सज्ज झाला आहे.
ADVERTISEMENT
निर्माता करण जोहरच्या सिनेमातून इब्राहिम बॉलिवूडमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. करण लवकरच तख्त हा सिनेमा आणणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेता रणवीस सिंग आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर या सिनेमात इब्राहिम केवळ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणार असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिमला केवळ चित्रपट निर्मितीची प्रक्रिया शिकायची आहे. त्याला अभिनेता म्हणून लाँच करण्यासाठी अजून काहीही कल्पना केलेली नाही. सध्या इब्राहिम त्याचं शिक्षण पूर्ण करतोय. शिक्षण पूर्ण करून तो अभिनेता बनणार आहे. त्यामुळे सध्यातरी तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार नाहीये.
ADVERTISEMENT