ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो.सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात वडाला पाच प्रदिक्षणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी आणि सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये संजू आणि लतिका वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. संजूची वटपौर्णिमा जरा आगळीवेगळी असणार आहे. नोकरीचं आणि घराचं कर्तव्य संजू पार पाडताना दिसणार आहे. यामध्ये तिला रणजीतची खंबीर साथ देखील मिळणार आहे.
ADVERTISEMENT
राजा रानीची जोडी मालिकेमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे. संजुने आता रणजीतचे स्वप्न पूर्ण केले आहे. PSI झाल्यापासून तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण संजु घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडताना दिसते आहे. राजश्री आणि अपर्णा दोघी मिळून संजुसाठी काही ना काही अडचणी निर्माण करण्याचा सतत प्रयत्न देखील करत आहेत. पण त्यांच्या सगळ्या कारस्थानांना संजु उत्तर देत आहे. याच सगळ्यामध्ये आता अजून एक भर म्हणजे गुलाब भोसले. गुलाब संजुच्या पहिल्या दिवसापासून विरोधातच आहे. त्यामुळे संजीवनीची वटपौर्णिमेची पूजा कशी पूर्ण नाही होणार याच्या प्रयत्नात गुलाब आहे तर दूसरीकडे कुसुमावतीला देखील संजुने वटपौर्णिमाची पूजा करणार असे वचन दिले आहे. रणजीतच्या साथीने संजू ही पूजा कशी पार पाडणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
अभि – लतीचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण बापूंचे पैसे मिळाल्यावर अभी लतिकाला बापूंना साभार परत करणार हे मात्र घरातील कोणालाच माहिती नाही. अभिमन्यु आणि लतिकाने हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवले. आता मात्र लतिका निर्णयावर पोहचली आहे की ती अजून त्यांच्या नात्याबद्दल अजून लपवू शकणार नाही आणि सगळ्यांना सांगणार. कामिनीला मात्र हे सत्य माहिती आहे आणि ती वटपौर्णिमेच्या दिवशी लतिका आणि अभिच्या घरच्यांसमोर ही गोष्ट उघडकीस आणणार आहे, की यांचे लग्न खोट आहे.
ADVERTISEMENT