ADVERTISEMENT
सारा अली खान आणि जान्हवी कपूर बॉलिवूडमधील बेस्ट फ्रेंड आहेत.
मागील अनेक दिवसांपासून सारा आणि जान्हवी अनेक ठिकाणी एकत्र दिसून येत आहेत.
नुकत्याच दोघीही केदारनाथच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथील दोघींचे फोटो सध्या बरेच व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये दोघीही केदारनाथचे दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघींनी मंदिरात पूजा देखील केली आहे.
सोशल मीडियावर सारा आणि जान्हवी यांचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना फारच आवडला आहे.
एका यूजरने असंही म्हटलं आहे की, ‘वाह.. याला म्हणतात संस्कार. तुम्ही दोघी खूप चांगलं काम करत आहात. ईश्वराची तुम्हा दोघींवर कृपा कायम राहो.’
या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की, दोघी खूपच एन्जॉय करत आहेत.
ADVERTISEMENT