मराठमोळा अभिनेता शशांक केतकरवर नवी मोठी जबाबदारी आली आहे. शशांक केतकर बाबा झाला आहे. अभिनेता शशांकच्या पत्नीने एका गोड मुलाला जन्म दिला आहे. शशांकने ही गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शशांकने सोशल मीडियावर बाळासोबतचा त्याचा एक फोटो शेअर केला आहे.
ADVERTISEMENT
इन्स्टाग्रामवर बाळासोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये शशांक फार खूश दिसतोय. या फोटोला कॅप्शन देताना शशांकने बाळाचं नावंही सांगितलं आहे. ऋग्वेद शशांक केतकर असं बाळाचं नाव ठेवण्यात आलं आहे. शशांकच्या या पोस्टवर चाहते फार खूश असून लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.
या फोटोमध्ये शशांकने बाळाचा चेहरा चाहत्यांना दिसू दिला नाहीये. काही दिवसांपूर्वी शशांकने सोशल मीडियाच्या माध्यमातून तो बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता शशांकच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
शशांक केतकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून तो घराघरात होता. शशांक लवकरच ‘पाहिले न मी तुला’ या नव्या मालिकेत झळकणार आहे.
ADVERTISEMENT