स्वप्नील जोशीचा स्त्री वेशातील लूक पाहिलात का?

मुंबई तक

• 12:35 PM • 29 Jan 2021

स्त्री वेशातील कलाकार म्हटलं की बालगंधर्व यांचं नाव हमखास घेतलं जातं. दरम्यान मराठी चित्रपटांमध्येही काही पुरुष कलाकारांनी स्त्री पात्राची भूमिका साकारल्या आहेत. तर अभिनेता स्वप्नील जोशीने त्याचा स्त्री वेशातील एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. स्वप्नीलने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो एका गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसतोय. त्याच्या या लूकमुळे अनेक […]

Mumbaitak
follow google news

स्त्री वेशातील कलाकार म्हटलं की बालगंधर्व यांचं नाव हमखास घेतलं जातं. दरम्यान मराठी चित्रपटांमध्येही काही पुरुष कलाकारांनी स्त्री पात्राची भूमिका साकारल्या आहेत. तर अभिनेता स्वप्नील जोशीने त्याचा स्त्री वेशातील एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हे वाचलं का?

स्वप्नीलने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो एका गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसतोय. त्याच्या या लूकमुळे अनेक लोकं संभ्रमात पडलेत. तर अनेकांना हा त्याच्या आगामी प्रोजेक्टचा भाग वाटला. मात्र स्वप्नीलचा हा फोटो तेरे घरच्या समोर या मालिकेतील आहे. या मालिकेमध्ये स्वप्नील एका हटके भूमिकेत दिसला होता.

या फोटोला स्वप्नीलने कॅप्शन देखील दिलंय. यामध्ये तो म्हणतो, ‘तेरे घरच्या समोर’ ही मालिका करताना दिग्गज कलाकारांकडून बरंच काही शिकता आलं. हा अनुभव मला समृद्ध करून गेलाय. स्त्री भूमिका साकारणं, “ती” होणं खरंच सोपं नाही. “ती” जखमांचं गोंदण मिरवणारी सक्षम सखी आहे. जी स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे. अश्या प्रत्येक “ती”च स्वप्न पूर्ण करायला shop with ti तयार आहे.”

मराठी सिनेसृष्टीत आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी स्त्री भूमिका सक्षमपणे साकारल्या आहेत. यामध्ये विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव, सचिन पिळगांवकर, सुबोध भावे, प्रसाद ओक तसंच दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या.

सध्या स्वप्नील जोशीच्या आगामी समांतर 2 या वेब सिरीजची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. या सिरीजच्या पहिल्या सिजनला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर दुसऱ्या सिजनचं शुटींगही संपलं आहे. त्यामुळे लवकरच ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये नवं गूढ काय असणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

    follow whatsapp