‘हाऊज द जोश’ हे शब्दच प्रत्येकाला उरी सिनेमाची आठवण करून देतात. तर उरी सिनेमाचा जोश पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि तो देखील थिएटरमध्ये. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज करण्यात आलाय. त्यामुळे आजच्या दिवशी उरी सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन पाहता येणार आहे.
ADVERTISEMENT
तरण आदर्श यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिलीये. ते म्हणाले, “ज्याने 2019 मध्ये लोकांची मने जिंकली होती तो उरी थिएटरमध्ये परत येणारे.” मुंबई, पुणे, नागपूर, कानपूर, कोलकाता, नोएडासह अशा देशातील 29 शहरांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार करण्यात येतोय. याअगोदर हा चित्रपट कारगिल विजयदिनी महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला होता.
2019 मध्ये ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता. त्यावेळी या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने धुमाकुळ घातला होता. या सिनेमात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत असून त्याच्या दमदार अभिनयाचंही सर्वांकडून कौतुक करण्यात आलं होतं.
‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ हा सिनेमा 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशल, अभिनेते परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत.
ADVERTISEMENT