Gufi Paintal Passed Away: मुंबई: मनोरंजन क्षेत्रातून आणखी दु:खद बातमी समोर आली आहे. काल (4 जून) सुलोचना दीदीचं (Sulochana Didi) निधन झालं होतं. तर आता टीव्ही विश्वातील सर्वात सुप्रसिद्ध मालिका ठरलेल्या ‘महाभारत’मधील (Mahabharata) शकुनी मामाची (Shakuni Mama) भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल (Gufi Paintal) यांचं आज (5 जून) प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने टीव्ही आणि सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. (veteran actor gufi paintal passed away shakuni mama mahabharata tv serial bollywood)
ADVERTISEMENT
अभिनेते गुफी पेंटल आजारपणामुळे बराच काळ रुग्णालयात दाखल होते. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्याच्या उपचारात कोणतीही कसर सोडली नाही. पण आज (5 जून) सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात वयाच्या 78 व्या वर्षी गुफी पेंटल यांनी अखेरचा श्वास घेतला आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंधेरीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
गुफी पेंटल लष्कर सोडून अभिनेता का बनलेले?
गुफी पेंटल यांना लोक टीव्ही शो ‘महाभारत’मधील शकुनी मामा म्हणून ओळखतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. पण गुफी पेंटल अभिनेता होण्यापूर्वी लष्करात होते. पण त्यांचा भाऊ अमरजीत पेंटल हे आधीच बॉलिवूडमध्ये अभिनेते म्हणून काम करत होते. अशा परिस्थितीत आपल्या भावाला पाहून गुफी पेंटल यांनीही मुंबईत येऊन अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवला.
हे ही वाचा >> गद्दारांची वर्षपूर्ती अन् 9 वर्षांच आत्मपरीक्षण, अजित पवारांची केंद्रासह राज्य सरकार टीका
‘या’ टीव्ही शोमध्ये केले काम
गुफी पेंटल यांनी ‘महाभारत’सह अनेक टीव्ही शोमध्ये काम केले. ते ‘अकबर बिरबल’, ‘सीआयडी’ आणि ‘राधा कृष्ण’ सारख्या अनेक शोमध्ये दिसून आले. पण, गुफी यांना खरी ओळख बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतून मिळाली. ‘महाभारत’मध्ये शकुनी मामाची भूमिका साकारून ते घराघरात पोहचले होते. आजही लोक त्यांना ‘शकुनी मामा’ या नावाने ओळखतात. त्यांनी साकारलेली ती भूमिका हीच त्यांची ओळख बनली होती.
मोठ्या पडद्यावरही झळकलेले गूफी पेंटल
चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर गुफी पेंटल यांनी ‘दावा’, ‘सुहाग’, ‘देश परदेस’ आणि ‘घूम’ यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या शानदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, गुफी पेंटल यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही काम केले होते. स्टार प्लसवरील ‘जय कन्हैया लाल की’ हा त्यांचा शेवटचा शो होता.
हे ही वाचा >> “मोदी, शाहांच्या हिमतीचे बुडबुडे फुटतील”, संजय राऊतांनी चढवला हल्ला
गुफी पेंटलच्या जाण्याने त्याच्या सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला असला तरी ते चाहत्यांच्या आठवणीत सदैव जिवंत राहतील.
ADVERTISEMENT