Sulochana Latkar : पडद्यावरील आई गेली! सुलोचना दीदी यांचं निधन

मुंबई तक

04 Jun 2023 (अपडेटेड: 04 Jun 2023, 01:59 PM)

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी उर्फ सुलोचना लाटकर यांचं निधन झालं. त्या 94 वर्षांच्या होत्या. सुलोचना दीदींवर मुंबईतील सुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Veteran actress Sulochana Didi aka Sulochana Latkar passed away. She was 94 years old. Sulochana Didi is being treated at Sushrusha Hospital in Mumbai.

Veteran actress Sulochana Didi aka Sulochana Latkar passed away. She was 94 years old. Sulochana Didi is being treated at Sushrusha Hospital in Mumbai.

follow google news

Sulochana Latkar news : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सोज्वळ, निरागस अभिनयातून कोट्यवधी चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 94 वर्षाच्या होत्या. सुलोचना दीदी यांच्या नातीने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.आमच्या लाडक्या आजी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती देताना आम्हाला अतिशय दु:ख होत असल्याचे सुलोचना दीदी यांच्या नातीने म्हटले आहे. दरम्यान आता सुलोचना दीदी यांना मनोरंजन विश्वासह राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.  (Who is Sulochana Didi (Sulochana Latkar)?

हे वाचलं का?

सुलोचना दीदी यांचे अंतिम दर्शन उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांच्या 11, प्रभा मंदिर सीएचएस,प्रभा नगर, पी.बाळू मार्ग नगर, प्रभादेवी. मुंबई या निवासस्थानी घेता येणार आहे. तसेच सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी बेळगावमध्ये चिकोडी तालुक्यातील खडकलरत गावी झाला. त्यांनी 1943 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. भालजी पेंढारकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांच्या विशेषत: ‘आई’च्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.

हे ही वाचा : Vaibhavi Upadhyaya Death : कार कोसळली दरीत! अभिनेत्रीचा भयंकर अपघातात मृत्यू

अशी होती सुलोचना दीदींची अभिनयाची कारकीर्द

सुलोचना दीदींची (Sulochana Latkar) प्रतिमा आजही लाखो सिनेरसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि प्रेमळ आई त्यांनी पडद्यावर उत्तमपणे वठवली. 1953-54 मध्ये सुलोचना यांचे ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ हे सिनेमे खूप गाजले. त्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावतच गेला.

‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर सिनेमे ठरले. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

सुलोनचा दीदींचे हे चित्रपट गाजले

त्यांचा मोतीलाल यांच्या बरोबरचा ‘मुक्ती’ हा चित्रपटही गाजला. त्यानंतर त्यांनी सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर, नाजिर हुसैन, अशोक कुमार यांच्या सोबतही काम केले. नायिका म्हणून त्यांनी 30 ते 40 चित्रपट केले असतील. ‘दिल देके देखो’ या 1959 मधील सिनेमात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली.

त्यानंतर 1995 पर्यंत त्यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांच्या ‘आई’ची भूमिका वठवली. मराठीत त्यांनी 50, तर हिंदीत 250 सिनेमे केले. सुलोचना दीदींना 1999 मध्ये ‘पद्मश्री’, तर 2009 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

    follow whatsapp