Maharashtra Vidhan Sabha मुंबई : यंदाची विधानसभा निवडणूक ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आणखी एक ठाकरे मैदानात उतरले आहेत. मुंबईतील दादर-माहिम मतदारसंघातून मनसेचे उमेदवार म्हणून अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत, शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि अमित ठाकरे अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. पहिल्याच निवडणुकीच्या निमित्तानं अमित ठाकरे हे मुंबई तकच्या 'चावडी'वर उपस्थित राहिले. यावेळी अमित ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यादरम्यानच, खळखट्याक करताना मनसैनिकांवर अनेक गुन्हे दाखल होतात, तसे तुमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, या प्रश्नाचं उत्तरंही अमित ठाकरे यांनी दिलं. (Amit Thackeray answer on Nepotism amid candidature vidhan sabha elections)
ADVERTISEMENT
हे ही वाचा Amit Thackeray: शिंदे सरकार असताना भोंग्याचा मुद्दा का लावून धरला नाही? अमित ठाकरे म्हणाले तुम्ही...
मनसेच्या सुरूवातीच्या काळापासूनच पक्ष चर्चेत राहिला तो, मनसैनिकांच्या खळखट्याक पॅटर्नमुळे. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राज्यात अनेक मनसैनिक रस्त्यावर उतरायचे, आंदोलनांमध्ये तोडफोड, जाळपोळ व्हायची, यात कित्येक मनसैनिकांवर गुन्हे दाखल होत असत. तर अशा आंदोलनांमध्ये किंवा खळखट्याकमध्ये राज ठाकरेंच्या मुलावर किती गुन्हे दाखल असा प्रश्न विचारला गेला. यावेळी अमित ठाकरे यांनी आपल्यावर आंदोलन किंवा तत्सम प्रकरणांचा एकही गुन्हा दाखल नाही असं सांगितलं. भरपूर आंदोलनं केली, या सर्व गोष्टींसाठी आपण तयारही होतो, मात्र अद्याप आपल्यावर एकही गुन्हा दाखल नाही, भविष्यात जर संघर्ष करावा लागला तर आपण तयार आहोत असंही अमित ठाकरे यांनी सांगितलं.
घराणेशाहीच्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर
हे ही वाचा Mumbai Tak Chavdi : "राज साहेबांचा मुलगा म्हणून मतदान करू नका, तर...", अमित ठाकरेंचं जनतेला मोठं आवाहन
अमित ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र असल्यानं त्यांना घराणेशाहीबद्दल विचारला जातोय. याबद्दल बोलताना अमित ठाकरे म्हणाले, की अभिनय आणि राजकारण हे दोन असे क्षेत्र आहे की, जनता तुमचं भविष्य ठरवत असते. एखाद्या अभिनेत्याच्या चित्रपटाला लोक गेलेच नाहीत किंवा आम्हाला मतदानच केलं नाही तर घरीच बसावं लागणार आहे. त्यामुळे जनताच ठरवत असते. तसंच मला शेवटच्या क्षणापर्यंत माहिती नव्हतं की या निवडणुकीत मला कुठला मतदारसंघ मिळणार. मी राज ठाकरेंकडे तसं काही मागितलंही नव्हतं. फक्त राज ठाकरेंनी मला विचारलं होतं की, तुझी तयारी आहे का? त्यावर मी त्यांना मी तयार असल्याचं सांगितलं होतं. यादीत नाव येणार की नाही, कुठला मतदारसंघ मिळणार याबद्दल मला काहीही माहिती नव्हती असं अमित ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT