MVA : मविआचा जागावाटपासाठी 'हा' फॉर्म्युला?; ठाकरे-पवारांच्या पक्षाला किती जागा?

मुंबई तक

25 Jun 2024 (अपडेटेड: 25 Jun 2024, 01:35 PM)

MVA Vidhan Sabha Election 2024 : ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आधी जागावाटपावर जोर दिला आहे. 

समसमान जागावाटप करण्यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे एकमत असल्याची माहिती.

महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित करण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

point

महाविकास आघाडीचा जागावाटपासाठी फॉर्म्युला काय?

point

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेे पक्षाला किती जागा मिळणार?

Maharashtra Assembly Election 2024, Maha Vikas Aghadi : लोकसभेची निवडणूक आटोपताच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने आतापासूनच तयारी सुरू केली असून, जागावाटपावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. एका वृत्तानुसार महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र ठरले असून, कुणीही मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ नसेल, समान जागा तिन्ही पक्षाना मिळतील, असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

द न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या रिपोर्टनुसार महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला समसमान जागा येणार आहे. 

महाविकास आघाडीचा जागावाटपासाठी कोणता फॉर्म्युला ठरला?

मविआतील विश्वसनीय सूत्रांचा हवाला देत हे वृत्त देण्यात आले असून, तिन्ही पक्ष विधानसभेच्या समान जागा लढतील. 96  चा फॉर्म्युला ठरला असून, त्यानुसार तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी 96 जागा मिळणार, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >> "निकमांची 'सरकारी वकील' नियुक्ती रद्द करा", प्रकरण कोर्टात 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसकडून जास्त जागांची मागणी करण्यात आली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असे विधान काही दिवसांपूर्वी केले होते की काँग्रेसचे 13 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात.

हेही वाचा >> सुजय विखेंनी चॅलेंज दिलं, निलेश लंकेंनी पूर्ण केलं 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही शंभर जागा मिळाव्या अशी मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडी एकसंघ राहावी या उद्देशाने आता तिन्ही पक्ष तडजोड करण्यास तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मित्रपक्षांना आपापल्या कोट्यातून जागा

सूत्रांनी जी माहिती दिली आहे, त्यानुसार महाविकास आघाडीतील जे मित्र पक्ष आहेत. त्यांना या तिन्ही पक्षांच्या कोट्यातून जागा दिल्या जातील. समाजवादी पक्षाला काँग्रेसच्या कोट्यातून, तर राजू शेट्टी सोबत आल्यास त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून जागा सोडल्या जाऊ शकतात. 

आंबेडकर आल्यास तडजोड होणार?

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली. मात्र, विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झाल्यास त्यांच्यासाठी तडजोड करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. 

    follow whatsapp