Raj Thackeray: मुंबई: 'एखाद-दोन उद्योग तिथे (गुजरात) गेल्याने असा काही फार मोठा महाराष्ट्रावर परिणाम होतोय असं काही नाही.' असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केलं आहे. ज्यावरून आता विरोधक मात्र त्यांना घेरण्याच्या तयारीत आहे. (exclusive interview why did raj thackeray say it doesnt matter if one or two industries move from maharashtra)
ADVERTISEMENT
पाहा मुंबई Tak ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले
'आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार?'
हे ही वाचा>> Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक यांना निवडणूक आगोची नोटीस, लाडक्या बहिणींबद्दल केलेलं वक्तव्य भोवणार?
'सगळ्यात आधी उद्योग गेले नाहीच पाहिजे, पण एखाद-दोन उद्योग तिथे गेल्याने असा काही फार मोठा महाराष्ट्रावर परिणाम होतोय असं काही नाही. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या सगळ्यात मोठं राज्य आहे. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार?'
'जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> Ajit Pawar Exclusive: 'मविआ लाडक्या बहिणींसाठी 3000 रुपये देणार', अजित पवारांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...
'बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबादच का?'
'अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का?' असा खडा सवालही राज ठाकरेंनी यावेळी विचारला.
'भाजपने कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला...'
'२०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
'पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच'
'पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे.' अशी खरमरीत टीकाही राज ठाकरेंनी यावेळी केली.
ADVERTISEMENT