Raj Thackeray : जो कुणाचाच झाला नाही, त्याच्याबद्दल...सदा सरवणकरांवर पहिला हल्ला, राज ठाकरे गरजले

मुंबई तक

11 Nov 2024 (अपडेटेड: 11 Nov 2024, 12:58 PM)

मनसेकडून अमित ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत अशी तिरंगी लढत या मतदारसंघा होणार आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

लेकासाठी राज ठाकरेंची पहिलीच सभा

point

प्रभादेवीमध्ये राज ठाकरे बरसले

point

सरवणकर, महेश सावंतांचं नाव न घेता हल्ला

Raj Thackeray Prabhadevi : अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात उतरल्यापासूनच दादर-माहिम विधानसभा मतदारसंघ या चर्चेत आहे. एकीकडे अमित ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत अशी तिरंगी लढत या मतदारसंघा होणार आहे. तिकीट वाटपापूर्वीच या मतदारसंघात मोठा पॉलिटीकल ड्रामा झाल्याचं पाहायला मिळालं.  त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे.राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंसाठी काल 10 नोव्हेंबररोजी प्रभादेवीमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. जो कुणाचाच नाही झाला, त्याच्याबद्दल काय बोलणार असं म्हणत राज ठाकरे यांनी सदा सरवणकरांवर निशाणा साधला.

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >>Raj Thackeray: 'एक-दोन उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही', राज ठाकरे असं का म्हणाले?

 

बाळासाहेब ठाकरे हयात असताना ही व्यक्ति काँग्रेसमध्ये गेली, काँग्रेसमध्ये आमदारकीला पराभूत झाली, त्यानंतर पुन्हा शिवसेनेत आली, पुन्हा एकनाथ शिंदे गेल्यावर त्यांना शिव्या दिल्या आणि नंतर त्यांच शिंदेंबरोबर जाऊन बसले असं म्हणत सदा सरवणकर यांच्यावर नाव न घेता राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. तसंच दुसरी व्यक्तिही बाळासाहेब हयात असताना शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढली असं म्हणत महेश सावंत यांच्यावरही राज ठाकरेंनी निशाणा  साधला. 

हे ही वाचा >>Ajit Pawar Exclusive: 'मविआ लाडक्या बहिणींसाठी 3000 रुपये देणार', अजित पवारांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...

 

राज ठाकरे यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. ठाकरे कुटुंबातलं पहिल्यांदा कुणीतरी निवडणुकीला उभं राहणार, म्हणून मी तेव्हा उमेदवार दिला नाही असं राज ठाकरे म्हणाले. तसंच त्यावेळी आपण कुणालाही असं म्हणालो नाही की, "आज मी उमेदवार देत नाही म्हणून तू मला उद्या सांभाळून घे." मी जे काही केलं ते माझ्या मनाला वाटलं म्हणून केलं असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. 

 

राज ठाकरे यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित ठाकरे यांना उमेदवारी देताना आणि उमेदवारी दिल्यानंतर काय घडलं ते सांगितलं. "तुम्ही उमेदवार देणार नसाल, तर मी अमितला उभं करेन अशी माझी अटच नव्हती. मी अमितचं नाव घोषित केलं होतं. आमच्या एका बैठकीत काही नेत्यांनी भांडूपमधून लढवण्याचं सूचवलं होतं. मग मी अमितला विचारलं की, तू सिरीयस आहेस का? त्यावेळी मी त्याला म्हटलं की जिथे तु वाढलाय तिथे, दादर-माहिमध्ये निवडणूक लढ. त्याने किनारा साफ करण्याची वगैरे कामंही केली. आम्ही पहिल्या यादीत नाव घोषित केल्यावर हे सर्व सुरू झालं.समोरच्यांना वाटत असेल की, त्यांनी उमेदवार देऊ नये तर ते त्यांच्या मनाने करावं. तुम्हाला वाटत असेल तर करा, नाहीतर नका करू, ही जबरदस्ती होऊ शकत नाही. मी महायुतीतला घटक नाही, लोकसभेला पाठिंबा दिला होता वगैरे गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला हव्या होत्या, मी नाही."  असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

 

    follow whatsapp