Maharashtra Vidhan Sabha मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा जागावाटपाचा विषय चर्चेत राहिला. त्यातच शिवसेनेत आपल्यासोबत गुवाहाटीला आलेल्या आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचं आव्हान एकनाथ शिंदेंसमोर होतं. महायुतीसोबत असलेल्या एकनाथ शिंदेंनी आतापर्यंत 45 जागा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता काल पुन्हा 20 जागा जाहीर केल्या. यामध्ये आता पालघर आणि बोईसरच्या जागांचा तिढाही सुटलेला दिसतोय. मात्र, पालघरमध्ये पुन्हा एका ट्विस्ट पाहायला मिळाला. कारण एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये असलेल्या श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट झाला आहे. तर त्यांच्या जागेवर आता राजेंद्र गावित यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे राजेंद्र गावित यांच्या पक्ष बलण्याचा रेकॉर्ड झालाय. (Rajendra Gavit joins CM Eknath Shinde Shiv Sena 5th time changed party)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Vidhan Sabha Elections : अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक; महायुती-मविआच्या किती जागा जाहीर होणं बाकी?
राजेंद्र गावित हे कायमच पक्ष बदलण्यामुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांनी आतापर्यंत काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिंदे-गट, पुन्हा भाजप असा चार वेळा पक्षांतर केले होते. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रांजेंद्र गावित यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी घेतल्यानं तब्बल पाचव्यांदा त्यांनी पक्षांतर केलंय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट झाला. त्यांच्याऐवजी आता या मतदारसंघातून राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे आता राजेंद्र गावित यांचा सामना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांच्याशी होणार आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काल राजेंद्र गावित, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना दानवे आणि बोईसरमधील माजी आमदार विलास तरे यांचा प्रवेश झाला. यातील राजेंद्र गावित हे पालघरमधून, संजना दानवे यांना कन्नडमधून तर विलास तरे हे बोईसरमून विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या या नेत्यांच्या परफॉर्मन्सकडे आता सर्वांचंच लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT