Devendra Fadnavis : "आपल्या बोलण्यातून तेढ...", देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना राजधर्माची आठवण करुन दिली

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडून मोर्चे आयोजित केले गेले. या मोर्चांमध्ये नितेश राणे हे सहभागी झालेले होते. यावेळी नितेश राणे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

Mumbai Tak

सुधीर काकडे

20 Mar 2025 (अपडेटेड: 20 Mar 2025, 11:35 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जयंत पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

point

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांबद्दल फडणवीस काय म्हणाले?

point

अटलजींचं नाव घेत राजधर्माची आठवण कुणाला करुन दिली?

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत घेतली. लोकमत वृ्त्त समुहाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते आणि कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमात विरोधी पक्षात असलेले जयंत पाटील हेच फडणवीसांना प्रश्न विचारणार असल्यानं सर्वांचं लक्ष लागून होतं. जयंत पाटील यांनी या मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्‍यांबद्दल विचारलेल्या प्रश्नाची आता चांगलीच चर्चा होतेय.

हे वाचलं का?

हे हे ही वाचा >> Disha Salian : नाईट पार्टी, कॉकटेल आणि 14 व्या मजल्याची गॅलरी... दिशाच्या फ्लॅटमध्ये काय घडलं होतं?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडून मोर्चे आयोजित केले गेले. या मोर्चांमध्ये नितेश राणे हे सहभागी झालेले होते. यावेळी नितेश राणे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. मुस्लिम धर्मीयांवर निशाणा साधत नितेश राणे यांनी मंत्री होण्यापूर्वी आणि मंत्री झाल्यानंतरही अनेकदा वाद निर्माण केले आहेत.  तसंच काल झालेल्या नागपूरमधील हिंसाचारानंतर नितेश राणेंवर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे. त्यावरुनच जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. 

सरकारचे जबाबदार मंत्री, विशिष्ट समाजाबद्दल टोकाची भाषा वापरतात. त्यामुळे तेढ निर्माण होतंय. त्यावर तुमची भूमिका काय? असा सवाल जयंत पाटील यांनी केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "अटलजींनी सांगितलं होतं, मंत्री म्हणून राजधर्म पाळायचा असतो. संविधानाने आपल्याला कुणावरही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आपली आहे. मंत्र्‍यांनी संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जे तरूण मंत्री बोलतात त्यांना मी समजून सांगतो की आता मंत्री आहात, संयम बाळगून बोललं पाहिजे."

हे हे ही वाचा >> Disha Salian च्या मृत्यूचं रहस्य 5 वर्षांनंतरही कायम, आदित्य ठाकरेंवर 'ते' आरोप अन्...

लव्ह जिहाद, लँड जिहाद, व्होट जिहाद अशा वेगवेगळ्या शब्दांचा उल्लेख करत नितेश राणेंनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. तर मंत्री होण्यापूर्वी त्यांनी थेट मशिदीत घुसण्याचीही भाषा केली होती. 

शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम नव्हतेच, केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान,बुरखा घालून परीक्षेला बसू देऊ नका, EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला, बाबरी तोडताना विचारत बसलो नाही, आता हीच ती वेळ, मशिदीत घुसून मारू...अशी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

    follow whatsapp